Tiger shocked expression सोशल मीडिया म्हणजे टाइमपास करण्याचं माध्यम असा समज आता हळूहळू मागे पडू लागला आहे. सोशल मीडियावरील जाहिराती, ऑनलाइन मोहिमा या साऱ्यांमुळे चित्र बदलत असलं तरी या माध्यमावरील व्हायरल कंटेटला मरण नाही. अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. बरं हे फोटो आणि व्हिडीओ नवेच असतात असं काही नाही अनेकदा जुने व्हिडीओही व्हायरल झाल्याची उदाहरणं आहेत. असाच एक भन्नाट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमधील वाघाच्या चेहऱ्यावरील हावभाव हे चर्चेचा विषय ठरत आहेत. या वाघाला जंगलामध्ये सोडण्यात आलं तेव्हाचा हा क्षण असून वाघ अगदीच आश्चर्याने पाहत असल्याचा फोटो सध्या चर्चेत आहे.
व्हायरल व्हिडीओमधील स्क्रीनशॉट टीव्हारेलिंग्टन या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. “हा फोटो जंगली प्राण्यांना जंगलामध्ये सोडण्यात आलं तेव्हाचे क्षण एकत्र करुन बनवण्यात आला आहे. त्यामधीलच हे वाघाचे हावभाव आहेत. वाघाने जंगल पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हे हावभाव होतो,” अशा अर्थाच्या कॅप्शनसहीत हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर आता या फोटोवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांना वाघाच्या चेहऱ्यावरील हे हावभाव फारच आवडले आहेत.
१)
२)
३)
४)
५)
६)
दरम्यान ज्या व्हायरल व्हिडीओमधून हा स्क्रीनशॉट घेण्यात आला आहे तो कसा आहे तुम्हीच पाहा…
याच व्हिडीओतील या फोटोला ४५ हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. तर हा फोटो लाइक करणाऱ्यांची संख्या ४ लाख ३१ हजारांहून अधिक आहे.