जंगल सफारीचा अनुभव हा प्रत्येकासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हे अनुभवायचे असते. खरं तर, लोक जंगलात जाऊन धोकादायक प्राणी बघायला खूप घाबरतात. पण तरीही ते जंगल सफारी करतात. कारण वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे जीवन जवळून पाहायला मिळते. मात्र, सफारीदरम्यान काही हिंस्र प्राणी वाहनाजवळ येऊन उभे राहून माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पर्यटकांच्या जीपसमोर एक वाघ आला आणि पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा.
वाघाला जंगलाचा राजा म्हणतात. वाघ हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. जंगलात राहणारे अनेक प्राणी त्याला घाबरतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जंगलाच्या मधोमध सफारी थांबल्यावर लोकांनी जंगलाच्या अप्रतिम दृश्याचे व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. मात्र, आपण एखाद्या धोकादायक प्राण्याशी सामना करणार आहोत याची त्यांना कल्पना नव्हती.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वाघ अचानक समोर येतो. अचानक वाघ पर्यटकांच्या गाडीकडे धावतो त्यामुळे पर्यटक घाबरुन जातात. पर्यकांची हालत खराब होते ते गाडी चालू करुन निघणारच वाघ दुसऱ्या दिशेनं निघून जातो. हा क्षण श्वास रोखणारा होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: ए..तोंडातला अंगठा काढ बाहेर; आईचा जबरदस्त जुगाड; चिमुकल्याची तोंडात बोट घालण्याची सवयच मोडली
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @joju_wildjunketअकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.