अनेकदा घरात काही काम करण्यासाठी आलेले कामगार घरात महिला एकट्या असल्याचं पाहून गैरवर्तन करतात. शिवाय त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात, याबाबतच्या अनेक घटना समोर येत असतात. शिवाय काही लोक तर विवाहित महिलांनाही गर्लफ्रेंड बनवण्याचा प्रयत्न करतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेतील मैकियन नावाच्या महिलेनबरोबर घडली आहे. तिने तिच्या पतीच्या फर्निचर दुकानात इलेक्ट्रिशियन आला होता, तेव्हा घडलेला एक किस्सा टिकटॉकवर शेअर केला आहे.
मैकियनने सांगितले की, तिचा पती आणि सासरे बाहेर होते तेव्हा ती फर्निचरच्या दुकानात एकटीच काहीतरी काम करत होती. यावेळी पंखा दुरुस्त करण्यासाठी एक इलेक्ट्रिशियन आला. यावेळी पंखा ठीक करण्यासाठी बेड आणि सोफा हलवण्याची गरज होती. यावेळी तिने इलेक्ट्रिशियनला मदतीसाठी बोलवले. पण मदतीसाठी येताना त्याने विचित्र उत्तर दिले, मैकियनने त्याला बोलावताच इलेक्ट्रिशियन म्हणाला, “आता तुमचा आदेश आहे, तर मला पाळावाच लागेल.”
‘तुझं लग्न झालंय हे कळल्यावर माझं हृदय तुटलं’
मैकियनने सांगितले की, तिने इलेक्ट्रिशियनच्या या विचित्र उत्तराकडे दुर्लक्ष केले आणि ऑफिसमध्ये दुसरं काम करायला सुरुवात केली. यानंतर इलेक्ट्रिशियनने तिला दुकानातील बाथरूम वापरण्याची परवानगी मागितली आणि नंतर बाहेर आल्यानंतर तो म्हणाला, “तू खूप सुंदर आहेस आणि तुझे लग्न झाले आहे हे समजल्यावर माझे हृदय तुटले. पण तरीही तुला माझ्याबरोबर वेळ घालवायचा असेल तर सांग, माझी काहीही हरकत नाही.”
‘तुझं लग्न झालंय तरीही…’
इलेक्ट्रिशियन पुढे म्हणाला, मी तुझ्यासाठी सोफ्यावर एक चिठ्ठी चिकटवली आहे. या सर्व प्रकाराने मैकियन अस्वस्थ झाली आणि इलेक्ट्रिशियन जाण्याची वाट पाहू लागली. तो निघून गेल्यानंतर मैकियन सोफ्यावरची चिठ्ठी वाचली. ज्यामध्ये लिहिलं होतं, “मला तुला कोणत्याही अडचणीत टाकायचे नाही पण तू खूप सुंदर आहेस. तुझे लग्न झाले असले तरीही तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर मला आनंदच होईल.”
“इलेक्ट्रिशियनच्या बॉसकडे तक्रार करा”
दरम्यान, मैकियनने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला, त्यानंतर त्याने इलेक्ट्रिशियनला इशारा दिला आणि इलेक्ट्रिशियननेही माफी मागितली. मात्र, हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिलं, “तुम्ही इलेक्ट्रीशियनच्या बॉसकडे याबाबत तक्रार करा.” तर दुसऱ्याने लिहिलं की, “त्याच्या कंपनीचा रिव्ह्यू गुगलवर लिहायला हवा.”