Shocking snake-child viral video: विषारी सापांची भीती कोणाला वाटत नाही… मोठी मोठी माणसं साप समोर पाहीला की थरथरायला लागतात आणि धूम ठोकून पळतात. स्वप्नातही साप हातात पकडण्याचा विचार कोणी करेल का? इंटरनेटवर अनेकदा सापांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. शिवाय आश्चर्यही वाटतं की असं कोणी कसं करू शकतं. मात्र, सध्या एका चिमुकल्याचा साप हातात पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

दोन्ही हातात दोन साप

सध्या इंटरनेटवर चिमुकल्याचा दोन्ही हातात साप पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा दोन चक्क दोन सापांशी खेळताना दिसत आहे. ते विषारी प्राणी आहेत याची कदाचित त्याला माहिती नसावी. या मुलाने एका नाही तर दोन सापांना दोन हातात पकडलं आहे. घराबाहेर पडताना या मुलाला दोन साप जाताना दिसले. त्यानंतर या पठ्ठ्याने सापांच्या शेपटाच्या बाजूने हातात पकडून तो चक्क खेळू लागला.

कलियुगपूर नावाच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘सापांच्या समाजात भीतीचे वातावरण’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये एक मुलगा पायऱ्या उतरत येतो आणि दोन साप त्याच्या दिशेने वेगाने येत असल्याचे दिसते. तो मुलगा सापांना बघून घाबरत नाही तर त्यांच्यासोबत खेळू लागतो. चिमुकल्याच्या या कृतीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून टाकलं आहे.

इंस्टाग्रामवरील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याला ४१ हजारांहून अधिक लाईक्स आहेत. यावर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. व्हिडीओ काढणाऱ्याला मुलाच्या जीवाची पर्वा नाही का अशा कमेंट्सही युजर्सनी दिल्या आहेत. तर काहींनी हा नक्कीच सर्पमित्राचा मुलगा असणार त्याच्या डोक्यावर भगवान शंकराचा हात आहे अशा कमेंट्स दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, सापांनाही माहीत आहे की मुले मनाने खरी असतात. म्हणऊनच ते साप मुलाला चावले नाहीत. पण असे करणे धोक्याचे आहे. पालकांनी मुलाची काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, मुलाने मनात विचार केला असेल की साप त्यांच्या घरात आहेत, हे त्याचे घर आहे आणि त्याला जे हवे तेच होईल.