Top 10 Largest Active Military Powers in the world 2025: जागतिक पातळवरील अस्थिरता आणि तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल यामुळे अनेक देश आता त्यांच्या संरक्षण धोरणाचे पुनर्मूल्यांकन करत आहेत. यासाठी लष्करी खर्चात वाढ करणे आणि सैन्याची कुमक वाढविण्याचा मार्ग अवलंबला जात आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, शीत युद्धाचा शेवट झाल्यानंतर जागितक स्तरावर लष्काराच्या खर्चात वाढ करण्यास सुरुवात झाली. मागच्या वर्षी हा खर्च एकूण २.७१८ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला. २०२३ च्या तुलनेत यात ९.४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

एकून जागतिक लष्करी अर्थसंकल्पाचा ६० टक्के वाटा फक्त पाच देशांनी उचलला आहे. त्यांचा एकत्रित खर्च १,६३५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचतो.

जागतिक सुरक्षा आणि भू-राजकीय प्रभावासाठी लष्करी बळ महत्त्वाचे असले तरी आज लष्करी क्षमतेचे एक प्राथमिक निदर्शक म्हणून तात्काळ उपलब्ध होणाऱ्या सक्रिय सैन्याची संख्येला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

२०२५ मध्ये सर्वात जास्त सक्रिय लष्करी मनुष्यबळ असलेले १० देश कोणते?

ग्लोबल फायरपॉवरने दिलेल्या माहितीनुसार, चीनकडे २०,३५,००० सक्रिय सैनिकी मनुष्यबळ असून सर्वाधिक सैन्य असेलला चीन प्रथम क्रमाकांचा देश आहे. या यादीत भारत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. भारताकडे १४,५५,५५० इतके सक्रिय लष्करी मनुष्यबळ आहे. दक्षिण आशियात एक बळकट संरक्षण क्षमता आणि वाढत्या प्रभावाचे प्रदर्शन यानिमित्त भारताकडून होत आहे.

अमेरिका तिसऱ्या स्थानावर असून त्यांच्याकडे १३,२८,००० सक्रिय सैन्य आहे. अमेरिकेने तंत्रज्ञानावर आधारित लष्करी गुंतवणूक केली असल्यामुळे सक्रिय सैन्याचा आकडा थोडा कमी केला आहे. तर पाश्चिमात्य देशांपैकी युक्रेन आणि रशियाने २०२२ नंतर सक्रिय सैन्यांच्या संख्येत वाढ केली आहे. दोन्ही देशात संघर्ष सुरू असून त्यांना अधिकची कुमक लागत आहे.

क्रमांकदेशसक्रिय सैन्याची संख्या
चीन२०,३५,०००
भारत१४,५५,५००
अमेरिका१३,२८,०००
उत्तर कोरिया१३,२०,०००
रशिया१३,२०,०००
युक्रेन९,००,०००
पाकिस्तान६,५४,०००
इराण६,१०,०००
दक्षिण कोरिया६,००,०००
१०व्हिएतनाम६,००,०००

पाकिस्तानकडे किती सैन्य?

लष्करी सामर्थ्यामध्ये पाकिस्तानचा क्रमांक सातवा लागतो. त्यांच्याकडे ६ लाख ५४ हजार इतके सक्रिय सैन्यबळ आहे. तर छोट्याशी व्हिएतनाम देशाकडेही सहा लाखांचे मनुष्यबळ आहे. २०२२ साली त्यांच्याकडे ४ लाख ७० हजार इतके सैन्य होते. मात्र त्यांनी तीन वर्षात यात मोठी वाढ केली आहे.