Boss chat Viral News On Social Media: आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता तुम्हीच पाहा की, इथे एक कर्मचारी आणि त्याच्या बॉसचे व्हॉट्सॲपचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बर्‍याच कर्मचार्‍यांसाठी सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या बॉस किंवा मॅनेजरकडून रजा मंजूर केली जाणे. कारण कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज पाहताच अनेक बॉसना डोकेदुखी होते. पण, जेव्हा आपण आजारी पडतो किंवा अचानक काही घटना घडते तेव्हा तर रजा घेण्याशिवाय पर्याय नसतो आणि ही सिक लिव्ह काही आधीच सांगता येत नाही, त्यामुळे आपल्याला ऐन वेळी सुट्टी घ्यावी लागते.

मात्र, सध्या एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कल्पना करा, तुम्ही ऑफिसला जात आहात आणि तुमचा गंभीर अपघात झाला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही तुमच्या बॉसला परिस्थितीबद्दल माहिती द्याल तेव्हा तो तुमची समस्या समजून घेईल. मात्र, त्याऐवजी तुम्ही ऑफिसला कधी पोहोचणार हा त्यांचा पहिला प्रश्न असेल तर? वाईट वाटेल ना, पण एका कर्मचाऱ्यासोबत असंच झालंय. कर्मचारी आणि बॉसमधील व्हॉट्सॲप चॅट समोर आले असून ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“फक्त मृत्यू माफ आहे”

हे व्हॉट्सअॅप चॅट तुम्ही पाहू शकता, यामध्ये कर्मचाऱ्याने अपघात झाल्यानंतर त्याच्या गाडीचा फोटो बॉसला पठवला आहे. फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की,अपघात किती गंभीर आहे. मात्र यावर बॉसने लिहिले, “तू किती वाजता ऑफिसला पोहोचणार ते मला सांगून ठेव” असं बॉसने म्हटलं. त्यानंतर बॉसने मेसेज केला की, “तुला उशीर का होणार हे मला समजले. पण कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूशिवाय तुला कामावर येण्यापासून रोखणारी कोणतीही गोष्ट कोणत्याही कंपनीत माफ केली जात नाही.” प्रत्येक ऑफिसचे वर्क कल्चर वेगळे असते. कामाच्या पद्धतीशिवाय कामाचा ताणही तितकाच जास्त असतो. दरम्यान, रजा मागणे सोपे नसते. तुम्ही जरी रजा मागितली तरी काही वेळा तुमच्या रजेचा अर्ज फेटाळला जातो. मात्र, अशा गंभीर परिस्थितीत तरी कंपनीने समजून घ्यावे, अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची अपेक्षा असते. मात्र, या बॉसचा नियम ऐकून सर्वच संतापले आहेत. आता हे चॅट वाचून तुम्हीच सांगा यामध्ये चूक कुणाची आहे.

पाहा चॅट फोटो

हेही वाचा >> चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; वृद्ध व्यक्तीबरोबर भर दिवसा काय घडलं पाहा; VIDEO पाहून गोंधळून जाल

नेटकरीही संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकरी यावर संतापले असून, हा असा कसा नियम म्हणून या कंपनीवर टीका होत आहे. युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करीत “पुन्हा त्या नोकरीकडे परत जाऊ नका. आणि जर भविष्यात कोणत्याही कंपनीने तुम्ही का सोडले असे विचारले तर तुम्ही हा स्क्रीनशॉट दाखवू शकता.” तर बऱ्याच लोकांनी यामध्ये कर्मचाऱ्याला चुकीचे ठरवत एवढे दिवस अशा कंपनीमध्ये कामच का केले, अशा ठिकाणी काम करण्यापेक्षा राजीनामा देणे चांगले. अशी प्रतिक्रिया दिली आहे.