Shocking video: रस्त्यावर कधी काय घडेल काही सांगू शकत नाही. रोज काहीतरी नवीन ड्रामा, भांडणं, अपघात, घडत असतात. पिसाळलेला घोडा, रेडा, बैल यांना आवरणं म्हणजे मोठं आव्हानच आहे. अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तरी त्याचं काय होईल, या कल्पनेनंच घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत एक विचित्र अपघात घडला आहे.भरवेगात असलेल्या निलगायीने बाईकल धडक दिली आहे. यावेळी निलगायीचे शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

इनायत नगर ठाण्याच्या हद्दीतील मिठे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या निलगायीने धडक दिल्याने २८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाता दरम्यान निलगायीचे शिंग छातीत घुसल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता. दुचाकीवरील तरुण इनायत नगर बाजारपेठेत जात असताना ही दुःखद घटना घडली. मिठे गावाजवळ रस्ता ओलांडणारी एक नीलगाय दुचाकीस्वाराला धडकली आणि ही दुर्घटना घडली. घटनेचा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ट्रकचा धक्का लागला अन् बाईकस्वार थेट… अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!

हा भीषण अपघात जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या धडकेत तरुण आणि नीलगाय या दोघांचाही मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमी दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेशच्या लग्नाला जवळपास पाच वर्षे झाली असून, त्याला एक चार वर्षांची मुलगी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.