Viral Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. लोकलमध्ये होणारी भांडणं आपल्याला काही नवीन नाहीत. त्यात महिलांचा डबा म्हटलं की, ही भांडणं काही साधीसुधी नसतात. महिलांची काही भांडणं हाणामारीपर्यंतदेखील येऊन पोहोचतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

असं म्हणतात, काही महिलांना भांडण करायला कारण लागत नाही. त्या कधीही, कुठेही, कोणत्याही कारणावरून वाद घालू शकतात. पण. गोची तेव्हा होते जेव्हा एका महिलेसमोर दुसरी महिलादेखील तोडीस तोड वाद घालत असते. कोणत्याही भांडणात जेव्हा दोन्ही व्यक्ती सारख्याला वारख्या असतात तेव्हा तो वाद खूप वाढत जातो. दिल्ली मेट्रोच काय, तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या भांडणांचे व्हिडीओही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. आतादेखील पुन्हा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात खूप गर्दी झाली आहे. त्यावेळी दोन जणींमध्ये एकमेकींना धक्का लागल्यावरून वाद सुरू होतो. यावेळी सुरुवातीला एकीचा दुसरीला धक्का लागला म्हणून दुसरी तिला जोरात धक्का देते. हळूहळू हा वाद खूप वाढतो आणि त्यातील एक जण दुसरीकडे डोळे मोठे करून पाहते. त्यानंतर आजूबाजूच्या महिला त्या दोघींना शांत करण्याचा प्रयत्न करतात. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nobody_4827 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बापरे मजेशीर आहे हे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “या बायका सकाळी सकाळी का भांडतात?”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “त्या बाईचे डोळे पाहून मला भीती वाटली”, तर आणखी एकाने लिहिलेय, “यांना सकाळी एवढा जोर कुठून येतो?”