हल्ली लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीत येण्यासाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. इन्स्टाग्राम रील प्रमाणे लोकांना त्यांच्या आयुष्यातील अनेक धाडस फक्त १ मिनिटापेक्षा कमी वेळात दाखवून सोशल मीडिया स्टार बनायचं असतं. यासाठी अनेकदा ते मर्यादा देखील ओलांडायला मागे पुढे विचार करत नाही. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये तरुणांनी प्रसिद्धीसाठी असा व्हिडीओ बनवलाय जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. हा व्हिडीओ बनवण्याच्या नादात त्यांना आपला जीवही गमवावा लागला असता किंवा इतर कोणामुळे दुखापत देखील झाली असती. व्हिडीओ बनवण्यासाठी हे तरूण थेट त्सुनामीमध्ये घुसलेले दिसून येत आहेत. पुढे त्यांचं काय होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

हा व्हिडीओ दीपांशू काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “त्सुनामीचा इशारा प्रत्येकासाठी होता, पण व्हिडीओ बनवणाऱ्या या हिरोंचा हा व्ह्यूज मिळवण्याचा आणि प्रसिद्ध होण्याचा शॉर्टकट! प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालण्यापेक्षा आणखी मूर्खपणा काय असू शकतो.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला ५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठचा आहे हे कळू शकले नसले तरी जे दिसत आहे ते खूपच भयानक आहे.

आणखी वाचा : याला म्हणतात कर्माचे फळ! उंटाला त्रास देत होता हा माणूस आणि…पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये एका मुलाने लाइफ जॅकेट घातलेलं दिसत आहे. तो झाडाला पंच मारतान दिसून येत आहे. समोरून पाण्याची जोरदार लाट त्याच्या दिशेने सरकत आहे. यादरम्यान भयानक लाटा पाहून काही लोक त्या मुलाकडे धावताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्वांच्या हातात कॅमेरे आहेत आणि ते त्या भयानक दृश्याचे व्हिडीओ शूट करत आहेत. लाटांना घाबरून पळणारे काही लोक पाहून झाडाला पंच मारणारा मुलगा मात्र आहे त्याच ठिकाणी थांबलेला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेले नाही. पण व्हिडीओत जे दिसत आहे ते खूपच भयावह आहे. पाणी इतकं वेगानं येतं की ते त्यात सारेच जण वाहून जातात.

आणखी वाचा : व्हीलचेअरवर बसलेला दिव्यांग अचानक खाली पडला अन् चालायला लागला! पाहून तुम्ही थक्क व्हाल, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बस चालवताना ड्रायव्हर अचानक बेशुद्ध पडला, पुणेकर गृहिणीने ‘जे’ केलं ते पाहून कराल कडक सॅल्युट!

या व्हिडीओतील मुलांचा हा मूर्खपणा पाहताच सोशल मीडियावर त्यांच्यावरील संतापाचा भडका उडाला आहे. हा व्हिडीओ पाहून एका यूजरने ट्विटरवर ‘ती माणुस आता माणुस राहिलेला नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने लिहिलं, “सोशल मीडियावर प्रसिद्धी होण्यासाठीचा हा मूर्खपणा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, “प्रत्येकाला प्रसिद्ध व्हावं असं वाटतं, भलेही यासाठी त्याने आपला जीव गमावला तरी चालेल. तेव्हा मित्रांनो, प्रसिद्धीच्या वलयात इतके प्रसिद्ध होऊ नका की तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल. निसर्गाचे नियम लक्षात ठेवा आणि कठोर परिश्रम आणि समर्पणाने प्रसिद्ध व्हा.”