scorecardresearch

Video : उघडा होऊन विचित्र डान्स करणाऱ्याला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “आधी जेव नाहीतर…”

व्हिडीओतील व्यक्ती अंगावरील कपडे काढून केवळ लुंगीवर विचित्र डान्स करताना दिसत आहे

Video : उघडा होऊन विचित्र डान्स करणाऱ्याला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “आधी जेव नाहीतर…”
व्हिडीओमधील व्यक्तीचा विचित्र डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्याला वेळेवर जेवण्याचा सल्ला दिला आहे. (Photo : Instagram)

सोशल मीडियावर आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघत असतो. या व्हिडीओमधील लोकांच्या टॅलेंटला दाददेखील देतो. कारण, अनेकजण आपल्या उत्कृष्ठ कलेचे प्रदर्शन सोशल मीडियावर करत असतात. त्यामुळे आपणाला ते व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. मात्र, याच सोशल मीडियाच्या फ्लॅटफॉर्मवर काही लोक उगीच वेडेवाकडे डान्सही करत असतात, जे पाहून आपणाला हसू आवरण कठीण होऊन जातं.

मात्र, सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत त्या व्हिडीओमधील व्यक्तीचा विचित्र डान्स पाहून लोकांनी त्याला, ‘अशा डान्समुळे तुझा शरीराला काहीतरी इजा होईल, त्यापेक्षा तू डान्स करणं सोडून दे.’ असा सल्ला दिला आहे. लोक असे का म्हणत आहेत, ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेलच. व्हायरल व्हिडीओमधील हा व्यक्ती कोणताही ताळमेळ न ठेवता नाचत असल्याच व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्यक्ती उघडा होऊन केवळ एका लुंगीवर मोकळ्या जागेत विचित्र डान्स करताना दिसत आहे.

हेही पाहा- Viral Video: दारुड्यांचा नादखुळा; भररस्त्यात गाडीच्या छतावर चढून बनवले पेग…

कपड्यांशिवाय विचित्र डान्स-

व्हिडीओतील व्यक्तीचा डान्स पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे, ‘आधी भरपूर जेवण कर, मग डान्स कर, नाहीतर तुझी हाड मोडतील’ असं नेटकरी म्हणत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती फक्त लुंगी घालून अतिशय उत्साहाने नाचत आहे. तो एका रिमिक्स गाण्यावर नाचत असून तो यावेळी आपण कधीही न पाहिलेल्या विचित्र अशा स्टेप्स करत आहे.. या व्हिडीओमधील व्यक्ती करत आहे, असा डान्स तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. शिवाय या माणसाचं शरीर पाहून तुम्हालला हसू येईल, कारण त्याच्या शरीराची प्रत्येक हाड आणि बरगड्या दिसत आहेत.

हेही पाहा- “हेल्मेट का नाही घातलं?” पोलिसांच्या प्रश्नावर तरुणीचं भन्नाट उत्तर, Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल

व्हिडिओ व्हायरल –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर mainul_shaikh_1 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ मिलियनहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे, तर लाखो लोकांनी तो लाईक केला आहे. व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ‘भाऊ, आराम करा, नाही तर हाड मोडतील. त्याचवेळी, काही लोकांनी असेही म्हटले आहे की, ‘याला पाहून तर कॅमेराही लाजला असेल.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 11:03 IST

संबंधित बातम्या