बदलत्या आणि शहरी जीवनशैलीमुळे लोकांच्या रोजच्या खाण्यात फास्ट फूडचा समावेश वाढला आहे. अनेक लोक घरातून कामावर जाताना किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर कमी वेळात तयार होणारे फास्ट फूड खाण्याला पसंती देतात. शिवाय ग्राहकांच्या जीभेला आवडणारे अनेक पदार्थदेखील रेस्टॉरंट पुरवत असतात. ग्राहकांना उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ पदार्थ खायला आवडतात यासाठी ग्राहकांचा विश्वास संपादन करणं रेस्टॉरंटसाठी मोठी कसोटी असते. अशातच आता अशी एक घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या मनात रेस्टॉरंटमधील पदार्थांच्या स्वच्छेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
हो कारण दक्षिण कॅरोलिना येथील बर्गर किंगच्या सहाय्यक व्यवस्थापकाने ग्राहकांना डस्टबिनमध्ये टाकून दिलेले फ्रेंच फ्राईज दिल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा रेस्टॉरंटमधील पदार्थांवरुन विश्वास उडाल्याचं बोललं जात आहे. द न्यूयॉर्क पोस्टनुसार, जैमे क्रिस्टीन मेजर (३९) याच्यावर सोमवारीडस्टबिनमधून फ्रेंच फ्राईज उचलून कंटेनरमध्ये टाकले आणि नंतर शिजवलेले फ्राईज त्यावरती ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय या प्रकरणी त्याच्यावर अन्न छेडछाडीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
फॉक्स कॅरोलिनाच्या वृत्तानुसार, केंद्रीय पोलीस विभागाने ९ जुलै रोजी फास्ट फूड जॉइंटमध्ये कथित घटनेला प्रतिसाद दिला. घटनास्थळी, त्यांना दोन महिला रेस्टॉरंटच्या कर्मचार्यांवर ओरडताना आणि धमकावाना दिसल्या. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिलांनी अधिकार्यांच्या विनंतीनुसार शांत होण्यास नकार दिला तेव्हा त्यांना अटक करण्यात आली आणि गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर दोन दिवसांनी बर्गर किंग मुख्यालयाने पोलिसांना बोलावले सांगितले की, मेजरने डस्टबिनमधिल फ्रेंच फ्राईज दिले होते. दरम्यान, पोलिसांनीमेजरला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर जाणूनबुजून अन्नात छेडछाड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.