गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आठवडाभर रडण्याचं चॅलेंज स्विकारणारा नायजेरियन व्यक्ती आंधळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाय ही अनोखी कृती केल्यामुळे त्याचे डोके दुखत आहे शिवाय डोळ्यांना आणि चेहऱ्यावर सूजही आली आहे. टेंबू एबेरे नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर तो कॉमेडियन असल्याचा दावा केला आहे. त्याने ‘क्राई-ए-थॉन’ हे चॅलेंज स्विकारलं होतं.

NY ब्रेकिंगच्या वृत्तानुसार, टेंबू एबेरे @237_towncryer अकाऊंटवरुन त्याने स्वत:ला प्रोत्सहान देण्याचे आवाहन फॉलोअर्सना केले होते .यावेळी त्याने लोकांनी सांगितले की, तुमच्या आयुष्यातील अडचणी, दु:खद प्रसंग मला पाठवा, मी तुमच्यासाठी रडेन. त्याने TikTok वर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये, तो लाइव्ह टाइमरच्या शेजारी बसल्याचं दिसत होतं, ज्यामध्ये २ तास ७ मिनिटे एवढा वेळ झाल्याचं दाखवत होतं.

हेही पाहा- चिमुकली कृत्रिम पाय लावून शाळेत जाताच मैत्रिणींच्या आनंदाला पारावार उरला नाही, हृदयस्पर्शी Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

टेंबू एबेरेने बीबीसीला सांगितलं, “मला पुन्हा रणनीती बनवावी लागली आणि माझे रडणे कमी करावे लागले,” एबेरेचा व्हिडिओ जगभरातील TikTokers युजर्सनी जवळपास ५.३ मिलियनहून अधिक वेळा पाहिला आहे, काहीजण त्याचे कौतुक करत आहेत. तर एका युजरने, “यार, तू हे करू शकतोस.” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. “प्रामाणिकपणे, मला वाटते की मी जास्त वेळ रडलो आणि माझ्याकडे अजूनही तो रेकॉर्ड आहे.” असं लिहिलं आहे.

तो तात्पुरता आंधळा कसा झाला हे बीबीसीने उघड केलेले नाही. परंतु, डोळ्यांमध्ये दबाव वाढल्यामुळे आणि डोकेदुखी आंधळेपणा जाणवू शकतो असं सांगण्यात आलं आहे. त्याने हे आव्हान स्विकारले तरीही त्याच्या प्रयत्नांची नोंद केली जाणार नाही, कारण त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये औपचारिकपणे प्रवेश केलाच नव्हता असं सांगण्यात आलं आहे.

हेही पाहा- “एक मिनिटही लागणार नाही…” पोलिसाने सर्वांसमोर तरुणाला गोळ्या घालण्याची दिली धमकी, Video व्हायरल होताच संतापले नेटकरी

अधिकृत रेकॉर्ड वेबसाइटनुसार, चार दिवसांच्या शेफच्या कुकिंग मॅरेथॉनने लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि नायजेरियामध्ये रेकॉर्ड करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गडबड सुरु केली. सलग १०० तास स्वयंपाक करण्याच्या हिल्डा बासीच्या रेकॉर्डच्या लोकप्रियतेमुळे, अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाइट दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली होती. “नायजेरियन पाककृती नकाशावर ठेवण्यासाठी” केलेल्या प्रयत्नांबद्दल सर्वसामान्य नागरिकांसह नायजेरियाच्या उपाध्यक्षांकडूनही कौतुकाची थाप मिळाली आहे.