सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपणाला पोट धरुन हसायला लावणारे असतात. तर अंगावार शहारा आणणारे भयंकर व्हिडीओ असतात. मात्र, या दोन्ही वितरिक्त काही व्हिडीओ असे असतात की ज्यामुळे आपणाला त्यामधून काही तरी सामजिक संदेश मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संकटकाळी आपण सर्व भारतीय जात, धर्म, प्रांताचा विचार न करता एकमेकांच्या मदतीला कसे धावून येतो याची साक्ष देणारा आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका स्कुटीवरुन एक विवाहीत दाम्पत्य रस्त्यावरुन जाताना दिसतं आहे. ते जात असलेल्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ देखील दिसतं आहे. ते पुढे निघाले असताना अचानक स्कुटीच्या खालच्या बाजूला आग लागते. गाडी चालवणाऱ्या व्यक्तील गाडीला आग लागल्याचं कळताच तो गाडी थांबवतो आणि त्याच्या पत्नीला खाली उतरतो.
हा व्यक्ती त्याची गाडी लावतो ना लावतो तोच त्याच्या गाडीने पेट घेतल्यालं तेथील नागरिकांना दिसताच कोणी पाण्याची बादली तर कोणी आपल्याजवळ असणारी पाण्याची बॉटल घेऊन ती आग विझवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतं आहे. दरम्यान शेजारच्या दुकानातील एक व्यक्तीआग विझवण्याचा सिलिंडर घेऊन येतात आणि ती आग पुर्णपणे विझवताना दिसतं आहेत.
हेही वाचा- प्रेम केलं एवढाच गुन्हा! प्रेमी युगुलास बेदम मारहाण करत थुंकी चाटायला लावली
या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून तो आता सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘डोम कावळा’ नावाच्या एका फेसबुक एकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून ‘भारतीयांची एकता’ असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी ‘दुसऱ्यांच्या संकटात धावून जाणारा हा खरा भारत आहे.’ अशा कमेंट या व्हिडीओखाली केल्या आहेत. तर आपल्यातील ही एकी अशीच राहायला हवी अशा कमेंटही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.