आपल्यापैकी अनेकजण ऑफिसला जाण्यासाठी सार्वजनिक बस, लोकल किंवा इतर वाहतुकीचा पर्याय वापरतात. तर काही लोक स्वतःच्या कार किंवा बाईकने ऑफिसला जातात. परंतु तुम्ही कधी कोणी विमानाने ऑफिसला गेल्याचं ऐकलं आहे का? कदाचित तुमचं उत्तर नाही असं असू शकतं. पण सध्या एका मुलीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. जी ऑफिसला जाण्यासाठी चक्क विमानाचा वापर करते. या मुलीचे वय केवळ २१ वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना राज्यातील २१ वर्षीय सोफिया सेलेन्टानोचीने न्यू जर्सीमध्ये इंटर्नशिपसाठी घर भाड्याने घेतले ज्यामुळे ती विमानाने ऑफिसला जाऊनही तिच्या पैशांची बचत होत आहे. सोफिया दर आठवड्याला चार्ल्सटन ते नेवार्कला जाण्यासाठी विमानाने प्रवास करते. याबाबतची माहिती तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय ती असं का करते यामागचे कारणही तिने सांगितलं आहे.

हेही पाहा – आता डासांपासून कायमची सुटका होणार? चिनी इंजिनीअरने बनवली डास मारण्याची भन्नाट मशिन, पाहा VIDEO

तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने ऑफिसला जाण्यासाठी विमान का वापरते याबाबतची माहिती सांगितलं आहे. तिने सांगितले की, जर मी माझं घर भाड्याने दिले असतं तर तिला महिना ३ हजार ४०० डॉलरपेक्षा जास्त भाडे द्यावे लागले असते. परंतु मला आठवड्यातून एकदा ऑफिसला जाणे सोयीचे वाटले, ज्याचा केवळ १०० डॉलर खर्च येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने पुढे सांगितलं की, विमानाने प्रवास करण्याचा एक फायदा असा झाला, तो म्हणजे तिला तिच्या कुटुंबासोबत राहता आलं. त्यामुळे तिला दुसऱ्या शहरात भाड्याच्या घरात राहावे लागले नाही. तसेच ती घरून निघल्यानंतर टॅक्सीने प्रवास करते आणि नंतर विमानाने प्रवास करते. या प्रवासाचा जेवणाच्या खर्चासह तिला महिन्याला २ हजार २५० डॉलर्स एवढा खर्च येतो. सेलेन्टानोने सांगितलं की, मॅनहॅटनमध्ये घराचे भाडे सरासरी ४ हजार २४१ डॉलर्सवर पोहोचली आहे. यामुळे तिला मॅनहॅटनमध्ये राहण्यापेक्षा विमानाने ऑफिसला जाणं परवडतं.