सध्या सोशल मीडियावर अनेक लहान मुलांचे गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये या चिमुकल्यांनी कधी भन्नाट डान्स केल्याचे तर कधी चुकीचे पण आत्मविश्वासाने पाढे म्हणतानाचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. शिवाय ते व्हिडीओ पाहून आपणाला हसू आवरण कठीण होतं. अशातच आता वडीलांकडे बोबड्या बोलात तक्रार करणाऱ्या एका चिमुकलीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवाय तिचं बोलणं ऐकून वडिलांनी शेवटी कान पकडून माफी मागितल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

वडील-मुलीचे नाते खूप खास असते, मुलगी हक्काने आपल्या वडिलांजवळ कोणतीही तक्रार न घाबरता करु शकते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक गोंडस मुलगी आपल्या वडिलांजवळ कशाची तरी तक्रार करत आहे. शिवाय ती ज्या पद्धतीने बोलत आहे आणि तिचे वडील जे एस्कप्रेशन देत आहेत, ते पाहून अनेकांनी या बापलेकीचं कौतुक केलं आहे.

हेही पाहा- शाळेत घेऊन जाणाऱ्या आईवर रुसला आणि चक्क स्कुटीवर मांडी घालून बसला, Video पाहून पोट धरून हसाल

हा व्हायरल व्हिडिओ नायरा माथूर आणि राहुल माथूर यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओत मुलगी तिच्या वडिलांना काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावर तिच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. व्हिडिओमध्ये, वडील आपल्या लहान मुलीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रत्येक वेळी अपयशी झाल्याचे दिसत आहेत.

हेही पाहा- Video: विद्यार्थ्यांना नाचताना पाहून शिक्षिकेलाही नाचण्याचा मोह आवरला नाही, भन्नाट डान्स होतोय Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय त्या मुलगी काय बोलतेय हे कळत नसल्याने तिचे तिला ‘मला माफ कर, काही कळत नाहीये’, असं म्हणताना दिसत आहेत. तरी पुन्हा पुन्हा वडील तिला अगदी निरागसपणे विचारतात, ‘तुला काय प्रॉब्लेम आहे?’ असं विचारत आहेत. तर हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘कोणी यांचे भाषांतर करू शकतो का?’. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसतआहे.