सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक लोकांच्या भन्नाट डान्सचे, देशी जुगाड वापरुन काहीतरी नवीन शोध लावलेल्या मुलांचे तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका गोंडस मांजरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल. शिवाय ही मांजर किती आज्ञाधारक आहे याचीदेखील तुम्हाला कल्पना येईल.
कारण, या व्हिडीओत एक व्यक्ती छोट्या आणि गोंडस मांजरीचे केसं कापताना दिसतं आहे. केस कापण्यासाठी हा व्यक्ती मांजरीच्या अंगाला कापड लावून त्याला कंगवा आणि कात्रीचा वापर करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने मांजराची मिशी कापली तरीही हे मांजर शांत बसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
मांजर या व्यक्तीला कटींग करुन देताना दिसतं आहे. आपण लहान मुलांना केस कापण्याच्या दुकानामध्ये घेऊन गेल्यावर ती किती दंगा करतात हे सर्वांना माहिती आहे. मात्र, ही मांजर मात्र शांत बसल्याचं बघून अनेक नेटकऱ्यांना या मांजरीचं आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवाय ही मांजर तर माणसांपेक्षा शांत बसल्याचं म्हटलं आहे.
हा व्हिडीओ @chaoticcatpics नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला असून आत्तापर्यंत तो २ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय हा व्हिडीओ लोकांना एवढा आवडला आहे की त्यांनी त्याला दाद देण्यासाठी आपल्या घरातील मांजराचे व्हिडीओ कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहेत. तर ‘या मांजराला त्याच्या मालकाने खूप चांगली सवय लावली आहे.’ तर काही नेटकरी म्हणत आहेत की, ‘हे मांजर खूप गोड असून असा मांजर आम्हालाही पाळायचा आहे.’ तर एकाने ‘हे मांजर माझ्यापेक्षाही शांत बसून केसं कापून देतं आहे, कारण मी माझे केस कापायला जातो तेव्हा इतका शांत बसत नाही.’