सध्या सोशल मीडियावर नेदरलँडमधील एका ‘रिव्हर्स ब्रिज’चा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या पुलाचे ड्रोन फुटेज समोर आले असून, व्हिडीओत पुलावरुन जाणारी वाहने काही सेकंदांसाठी पाण्यात अचानक गायब झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत वाहन गायब का होत आहेत? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@ValaAfshar नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा रिव्हर्स ब्रिजचा व्हिडिओ शेअर केरण्यात आला आहे. पुलावरून काही वाहने जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहेत. दरम्यान, पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर पुलावरुन जाणारी वाहने अचानक गायब होतात आणि पुन्हा पुलाच्या दुसऱ्या टोकाला दिसतात. त्यामुळे हा व्हिडिओ अप्रतिम अभियांत्रिकीचा एक भाग असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- भररस्त्यात बाईक पार्क केलेली दिसताच हत्ती धावत आला अन्…, Video शेअर करत वाहतूक पोलिसांनी समजावला नियम

…म्हणून वाहने गायब होतायत-

शिवाय तुम्हालाही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहताना, वाहने अचानक पाण्याखाली गायब होऊन पुन्हा पुलाच्या पलीकडे येताना दिसतील, असं दिसण्याचं कारण म्हणजे, पुलाचा मध्यभाग पाण्याखाली बनवण्यात आला असून पुलावरुन पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून पाण्याच्या मार्गात कोणताही बदल होणार नाही.

हेही वाचा- ‘Flipkart’ला निष्काळजीपणा भोवला! १२,४९९ रुपयांचा मोबाईल न दिल्याने महिलेला द्यावे लागले ४२ हजार

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यापासून आला होता पण तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ९.४ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर अनेकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने, ‘पहिल्यांदा मला काहीच समजले नाही, हे खूप आश्चर्यकारक दिसतं आहे.’ तर दुसरा वापरकर्ता म्हणतो, ‘हे किती अविश्वसनीय आहे.’ आणखी एका नेटकऱ्याने, ‘ ही युनिक इंजिनीअरिंग’ असल्याची कमेंट केली आहे.

२००२ मध्ये खुला केला पूल

नेदरलँडमधील हा पूल २०००२ मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. या पुलावरून दररोज सुमारे २८ हजार वाहने ये-जा करतात. पुलाचा पाण्याखालून काढलेला भाग तयार करण्यासाठी २२,००० घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. तर हे एवढं मोठं बांधकाम हे पाणी आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या जहाजाच्या वजनाचा भार पेलता यावा यासाठी असे करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending video of netherlands reverse bridge vehicles disappear for a few moments jap
First published on: 05-01-2023 at 13:49 IST