‘मनिके मागे हिते’ हे गाणे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोक या गाण्यावर डान्स व्हिडीओ बनवून व्हायरल करत आहेत. सध्या या गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंडच सुरू आहे. या ट्रेंडमध्ये या गाण्यावरील नव्या व्हिडीओने भर घातली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका महिलेने चक्क साडी नेसून या ‘मनिके मागे हिते’ या गाण्यावर जबरदस्त ठुमके लावले आहेत. या व्हिडीओमध्ये महिलेने प्रिंटेड पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून बिहू डान्स स्टेप्स करताना दिसून येतेय. बिहू हा आसाम राज्यातील पारंपारिक लोकनृत्याचा प्रकार आहे. यात महिलेचा कलाविष्कार पाहण्यासारखा आहे. घरासमोरील एका बागेत ही महिला डान्स करताना दिसून येतेय. या गाण्यावर नाचताना महिलेने असा शानदार डान्स केला की पाहणाऱ्या सर्वांना तिच्या अदांची जणू भूरळ पडली.

डान्स करण्याची हौस प्रत्येकालाच असते. काही लोक तर डान्सच्या माध्यमातून लाखो लोकांच्या मनावर राज्य करतात. डान्सच्याच जोरावर लाखो रुपये कमावल्याचे अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहे. तर काही लोक फक्त आवड म्हणून डान्स करतात. सध्या व्हायरल होत असलेली महिला हीसुद्धा फक्त आवड म्हणून डान्स करत करतेय. या व्हायरल व्हिडीओमधली महिला डान्सिंग अदा नावाने फेमस आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दररोज एक तरी डान्स व्हिडीओ शेअर करत असून अक्षरशः डान्स व्हिडीओचा भंडारच दिसून येतोय. तिच्या या डान्सच्या व्हिडीओला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे १० हजार फॉलोअर्स आहेत.

साडी घातल्यानंतर अनेकींचा चालताना सुद्धा गोंधळ उडतो. पण या महिलेने डान्स करताना साडी ज्या पद्धतीने कॅरी केलीय, ते पाहून पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारून जातील. तिचा हा व्हिडीओ १३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. यात तिच्या सुपरहिट डान्सला अनेकांनी दाद दिली आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला असून महिलेचा अंदाज पाहून अनेकजण या डान्सवर फिदा झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्या याच दिलखुलास डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेक ट्रेंडिंग हॅशटॅग्स आहेत. कमेंट बॉक्समध्ये तर अनेक प्रकारच्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा सर्वोत्कृष्ट व्हिडीओ असल्याच्या काहींनी कमेंट करत महिलेला लोकांनी प्रोत्साहन दिलं आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.