केरळच्या कोचीतील १२ वर्षांचा मुलगा पिता बनला आहे. कोचीत राहणारा हा मुलगा सर्वाधिक कमी वयाचा पिता ठरला आहे. नवजात मुलीचे आणि मुलाचे डिएनए जुळल्याने १२ वर्षांचा मुलगाच पिता असल्याचे सिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बारा वर्षीय मुलाने पिता होण्याची घटना अपवादात्मक नाही. परदेशात असे अनेकदा घडले आहे. हा मुलगा लवकर वयात आला असावा. मात्र इतक्या कमी वयात पिता होण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे,’ असे थिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर पी. के. जब्बार यांनी म्हटले आहे.

एका १६ वर्षीय तरुणीने काही महिन्यांपूर्वी कोचीतील एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. अशाप्रकारची ही पहिलीच घटना असल्याने या प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि त्यानंतर हा मुलगा देशातील सर्वाधिक कमी वयाचा पिता असल्याचे सिद्ध झाले. यासाठी नवजात मुलगी आणि पित्याचे डिएनए तपासण्यात आले. त्यावेळी नवजात मुलगी फक्त १८ दिवसांची होती. मुलगी आणि पित्याचे डिएनए जुळल्याने १२ वर्षीय मुलगा पिता असल्याचे निष्पन्न झाले.

वाचा- ‘आयफोन सिरी’ वापरत ४ वर्षाच्या मुलाने आईचा जीव वाचवला

या प्रकरणात बालिकेला जन्म देणारी १६ वर्षीय तरुणी १२ वर्षीय मुलाची नातेवाईक आहे. या प्रकरणी दोघांच्या कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये तरुणीने बाळाला जन्म दिल्यावर तिच्या कुटुंबीयांनी मुलीच्या वडिलांबद्दल विचारले. यानंतर मुलीने १२ वर्षीय मुलाबद्दल घरी माहिती दिली. या प्रकरणात दोघेही अल्पवयीन असल्याने दोघांवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twelve year old boy confirmed as the youngest father in india
First published on: 24-03-2017 at 15:20 IST