मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर वापरणाऱ्या युजर्ससाठी या प्लॅटफॉर्मवर मोठा बदल होऊ शकतो. ट्विटरने १ एप्रिल रोजी ट्विट करून, ते ‘एडिट’ बटणावर काम करत असल्याची माहिती दिली. ट्विटरच्या या ट्विटला यूजर्स ‘एप्रिल फूल’चा विनोद मानत आहेत पण, ट्विटरने या प्रकरणावर असे विचित्र उत्तर दिले, ज्यामुळे यूजर्स आणखी गोंधळले आहेत. जाणून घेऊया ट्विटरने ट्विट करून नेमके काय म्हटले आहे आणि हे एडिट फीचर कसे काम करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरने १ एप्रिल रोजी ट्विटद्वारे जाहीर केले की ते ‘एडिट’ बटणावर काम करत आहेत. या ट्विटवर जास्त लोक विश्वास ठेवत नाही आहेत. अनेक युजर्सनी ते ट्विट ‘एप्रिल फुल’ बनवण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे म्हटले आहे. कारण गेल्या काही वर्षात ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की ते ट्विट एडिट फीचर आणणार नाहीत. परंतु युजर या पर्यायाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गरमीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड; Viral Video पाहून पोट धरून हसाल

रिपोर्टनुसार, या संबंधी ट्विटरकडे विचारणा केली असता, ट्विटरने अत्यंत विचित्र उत्तर दिले. ट्विटरने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, ‘ट्विटर या विषयाची पुष्टीही करत नाही किंवा हे नाकारतही नाही.’ जर तुम्ही ट्विटर वापरकर्ते असाल तर तुम्हाला हे माहित असेल की आतापर्यंत ट्विटर वापरकर्त्यांकडे असे कोणतेही फीचर नाही ज्याचा वापर करून ते त्यांचे ट्विट एडिट करू शकतील.

पण ट्विटरचे हे नवे ट्विट बरोबर असेल तर असे होऊ शकते की, येत्या काही दिवसांत ट्विटर यूजर्स त्यांचे ट्विट एडिट करू शकतील आणि त्यांच्या चुका सुधारू शकतील. अशा परिस्थितीत ट्विटरने खरोखरच ‘एडिट’ पर्याय आणला तर फॉलोअर्स मूळ ट्विट पाहू शकतात की नाही हे पाहावे लागेल. तसंच एखादं ट्विट किती वेळा एडिट करता येईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ट्विटरवर ‘एडिट’ फीचर आल्यानंतरच कळणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter edit feature is april full prank or something else netizens were also confused by twitter response pvp
First published on: 02-04-2022 at 11:47 IST