Viral Video : सोशल मीडियावर मारहाणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक महिलांचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिला एका तरुणीला लाथांनी मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येणार.

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका गार्डनमध्ये दोन महिला एका तरुणीला लाथांनी मारहाण करत आहे. हा संतापजनक व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Deanceejay13 या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “या वीकेंडला माझ्या लहान सावत्र बहिणीबरोबर हे वाईट कृत्य घडले”

हेही वाचा : तरुणांना मिळणार फ्री लॅपटॉप? पीआयबीने सांगितले, या व्हायरल दाव्यामागचं सत्य…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओर अनेक यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे, काही यूजर्सनी मारहाण करणाऱ्या यो दोन महिलांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका यूजरने लिहिले, “हे संतापजनक कृत्य आहे. या महिलांवर कठोर कारवाई केली पाहिजे” तर एका यूजरने विचारपूस केली आहे, “ती तरुणी आता ठिक आहे का?”