Uber Driver Attacked Women: बंगळुरूमध्ये रिक्षाचालक, उबर, रॅपिडो, ओला अशा सर्वच वाहनचालकांच्या अरेरावीचे प्रकार वारंवार समोर येत असतात. पण यावेळेस समोर आलेली घटना ही अत्यंत निंदनीय व धक्कदायक आहे. उबर कंपनीच्या वाहनचालकाने चुकीच्या कॅबमध्ये बसल्यावरून ४८ वर्षीय महिला आणि तिच्या मुलाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ही घटना बंगळुरूच्या भोगनहल्ली येथील एका निवासी भागात घडली. आपल्या आजारी मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी महिलेने कॅब बुक केली होती. मात्र जेव्हा गाडी पिकअपच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा चुकून महिला त्या गाडीऐवजी दुसऱ्या गाडीत बसली. चूक लक्षात आल्यावर लगेचच महिलेने चालकाला सांगितले आणि ती गाडीतून उतरू लागली. आधी तिचा मुलगा गाडीतून उतरला पण त्यानंतर चालकाने अचानक गाडीचा वेग वाढवला आणि महिलेवर हल्ला केला. माथेफिरू वाहनचालकाने अनेकदा महिलेच्या डोक्यावर मारल्याचे तक्रारीत समजत आहे. गोंधळ ऐकून लगेचच स्थानिकांनी हस्तक्षेप केला पण तरीही वाहन चालक शांत व्हायला तयार नव्हता .

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी २५ वर्षीय ड्रायव्हर बसवराजू याला अटक केली. वाहन चालक हा बंगळुरूमधील मल्लेश्वरमचा रहिवासी आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिलेच्या पतीने सोशल मीडियावर हा धक्कादायक अनुभव शेअर केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. त्यांनी उबरकडे तक्रारही केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा<< “आमच्याकडे भीक मागायला येता आणि…” रिक्षावाल्याने रिक्षावर लावलेली पाटी वाचून प्रवासी भडकले

दरम्यान, सुदैवाने त्यावेळेस शेजारी व स्थानिकांनी पोलिसांना कॉल लावला. पण हे पाहून तो वाहनचालक पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. सुरक्षारक्षकांनी त्याला इमारतीच्या मुख्य गेटवर अडवले व त्यानंतर पोलिसांनी सदर चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती पोलीस व उबर हेल्पतर्फे देण्यात आली आहे.