रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी या निर्णयाचा विरोध केलाय. विशेष म्हणजे रशियामध्येही अनेक ठिकाणी युद्धाला विरोध करणारी निदर्शनं झाली आहेत. रशियन सरकारने हजारो आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. मात्र असं असतानाच आता पुतिन यांच्या प्रवक्त्याच्या मुलीनेच इन्स्टाग्रामवरुन युद्धविरोधी पोस्ट केल्याची माहिती समोर आलीय. इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान शुक्रवारी या तरुणीने युद्धाला विरोध करणाऱ्या घोषणा दिल्याचं पहायला मिळालं.

नक्की पाहा >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’

२४ वर्षीय एलिजाविता पेस्कोव्हाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन, “HET BOЙHE” म्हणजेच “नो टू वॉर” असा संदेश पोस्ट केलाय. युद्धाला नाही म्हणा, अशा अर्थाचा हा संदेश सध्या रशियाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी रशियात वापरला जातोय. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अशा संदेशाचा एक फोटोही ठेवला होता. रशियामधील टीव्ही रेनने हा स्क्रीनशॉट ट्विट केलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: एका बेटासाठी १३ जवान शहीद; रशियन जहाजाला पाहून म्हणाले होते “इथून…”

सध्या रशियामध्ये युद्धविरोधी आंदोलनामध्ये हेच शब्द आंदोलक वापरत आहेत. गुरुवारी रशियाने युक्रेनसोबतच युद्ध अटळ आहे असं जाहीर करत युक्रेनवर हल्ला केला. पुतिन यांच्या भाषणानंतर काही मिनिटांमध्ये युक्रेनच्या राजधानीसहीत २५ ठिकाणी हवाई हल्ले सुरु झाले.

नक्की पाहा >> Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

एलिजाविता पेस्कोव्हा ही डिमेट्री पेस्कोव्हा यांची मुलगी आहे. डिमेट्री हे रशियन सरकारचे मुख्य प्रवक्ते आहेत. एकीकडे डिमेट्री हे मागील काही दिवसांपासून सातत्याने रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला योग्य कसा आहे याबद्दल भाष्य करताना तसेच अमेरिका आणि सहकारी देशांवर टीका करताना दिसत आहेत.

नक्की वाचा >> Ukraine War : “…तर ५ लाख किलो वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”; रशियाची अमेरिकेला धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलिजाविताने ही इन्स्टा स्टोरी पोस्ट केल्यानंतर ती लगेच काढून टाकण्यात आल्याचंही दिसून आल्याचं बीबीसीच्या एका पत्रकाराने म्हटलंय. सध्या ही स्टोरी इन्स्टावर दिसत नसली तरी त्याचा स्क्रीनशॉट मात्र व्हायरल झालाय.