प्रत्येक गावा गावात शौचालय असावे यासाठी भारत सरकारने मोठ्या प्रमाणात जनजागृती करायला सुरूवात केली आहे. नवनवे उपक्रम राबवले जात आहे. घराघरात शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ‘गाव तिथे शौचालय’ ही संकल्पाना तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचायल बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले जात आहे. सचिन तेंडूलकरपासून महानायक अमिताभ बच्चन यारख्या दिग्गजांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे, वेगवेगळ्या उपाययोजना रावबून गावक-यांना घराघरात शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे अशातच नैनितालच्या नगर पालिका परिषदेने केलेली जाहिरात ही सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनली आहे. गावक-यांनी घरात शौचालय बांधावे यासाठी भन्नाट जाहिरात केली आहे आणि चौकात लावलेली ही जाहिरात अनेकांचे लक्ष खेचून घेत आहे.

अमिताभ बच्चन, शशि कपूर यांच्या दिवार सिनेमातले पोस्टर एका चौकात लावण्यात आले आहे. आता या चित्रपटातला प्रसिद्ध डॉयलॉग सगळ्यांनाच माहिती आहे. “आज मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बॅलेन्स है, तुम्हारे पास क्या है? ”मेरे पास माँ है” याच संवादाला थोडंसं तोडून मोडून जाहिरात केली आहे. एका बाजूला अमिताभ दुस-या बाजूला शशी कपूर आणि मध्ये निरुपमा रॉय. दोघंही आपापल्या घरी येण्यासाठी आईला आग्रह करत आहेत  ”पण ज्याच्या घरात शौचालय आहे त्याच्याच घरात मी जाईल ” असे त्या मोठ्या पोस्टरवर लिहिले आहे. खाली ”उघड्यावर शौचालयास जाऊ नका, घरातच शौचालय बनवा” अशी जाहिरात केली आहे. त्यामुळे ही हटके जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका फेसबुक अकाऊंटवरून ही जाहिरात शेअर करण्यात आली आहे.  ही जाहिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खूपच आवडली आहे त्यांनी देखील आपल्या ट्विटवर अकाउंटवर या जाहिरातीचा फोटो शेअर केला आहे.