Unique Tree Video Viral : तुम्ही आतापर्यंत लहान-मोठी अशी अनेक झाडं पाहिलं असलीत. अनेकदा काही झाडांची पानं, फुलं किंवा फळं बघून आपल्या प्रश्न पडतो की, ही अशी नेमकी का आहेत. कारण- अनेकदा त्यांचा आकार, रंग व रचनाच काही वेगळी, विचित्र असते. सध्या एका बागेतील अशाच एका विचित्र झाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांना प्रश्न प़डलाय की, हे नक्की झाडं आहे की राक्षस. कारण- वारा सुटताच ते अशा काही अनोख्या पद्धतीनं डोलतं की, ते पाहून कोणाच्याही पोटात भीतीचा गोळाच येईल.
व्हिडीओत एका झाडाच्या फांद्या वाऱ्याबरोबर वेड्यावाकड्या डोलतायत; पण ज्या प्रकारे त्या डोलतायत, ते पाहून असं वाटतं की, ते झाड कोणत्याही क्षणी आपल्या अंगावर कोसळेल. रात्रीच्या वेळी जर कोणी हे झाड जवळून असं डोलताना पाहिलं ना, तर खरंच त्याचा भीतीनं थरकाप उडेल.
झाडं डोलतंय की राक्षस
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक झाड आहे; पण त्याचा आकार अगदी एका मोठ्या राक्षसासारखा दिसतोय. जेव्हा ते विचित्र झाड वाऱ्याबरोबर डोलू लागतं तेव्हा ते असं दिसतं की, जणू काही राक्षस नाचत आहे. या विचित्र झाडाचं दृश्य दिवसा कॅमेऱ्यात कैद केलंय म्हणून बरं; अन्यथा जर कोणी रात्रीच्या वेळी या थरथरणाऱ्या राक्षसी वाटणाऱ्या झाडाला पाहिलं असतं, तर भीतीनं त्याचं काळीज बाहेर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असती.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कोणी म्हणत आहे “मम्मी, ट्री एक्सॉरसिस्ट बोलाव”, तर कोणी लिहिलं आहे “या झाडाखाली बसून अभ्यास करणारे टॉपर नाही, तर राक्षस बनतील. या विचित्र झाडाचा व्हिडीओ @_Dibyanshu73 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओवर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहिलंय की, मी ऐकले होते की निसर्गाचे अद्वितीय रंग असतात, ते भूतग्रस्तदेखील असू शकतात हे मी आज पाहिलं. दुसऱ्यानं लिहिलंय की, भाऊ, रात्री या बागेत एखाद्याला सोडा, त्याचा मृतदेह सकाळी परत येईल. तर तिसऱ्यानं लिहिलंय की, जय हो प्रभू, तुमची लीला अद्वितीय आहे.