यूपीमध्ये भाजपच्या विजयाने पुन्हा एकदा बुलडोझर चर्चेत आला आहे. सीएम योगींचा बुलडोझर हिट ठरला असून, विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बुलडोझर रॅली काढली आहे. या रॅलीत भाजप समर्थक मुख्यमंत्री योगी यांना बाबा बुलडोझर असं संबोधत घोषणा देताना दिसून आले.

खरे तर निवडणूक रॅलींमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी सीएम योगींवर निशाणा साधताना त्यांना बाबा बुलडोजर असे संबोधले. मात्र, अखिलेश यादव यांचे हे विधान मुख्यमंत्री योगींनी चिडवण्यापेक्षा त्याच्या उलट केलं. योगी आदित्यनाथ आणि भाजपने हे विधान सकारात्मक पद्धतीने जनतेसमोर ठेवला आणि माफिया आणि गुंडांचा नाश करणारा बुलडोझर दाखवला.

(हे ही वाचा: निव्वळ सात सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली Viral, नक्की काय झालं जाणून घ्या)

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगींच्या काही सभांमध्ये बुलडोझरही दिसला. ज्याची निवडणुकीदरम्यान खूप चर्चा झाली होती. ज्या बुलडोझरचे वर्णन विरोधकांनी भाजपच्या राजवटीच्या अपयशाचे प्रतीक म्हणून केले होते, त्याच बुलडोझरने भाजपला पुढे ढकलले आहे. कदाचित त्यामुळेच भाजपचे कार्यकर्ते आता बुलडोझरवर रॅली काढत आहेत.