लहान मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी अनेक पालक त्यांना शिक्षा करतात. मात्र, जसा जमाना बदलला तसं मुलांना समजवण्याच्या पद्धतीही बदललल्या आहेत. आताच्या पालकांना त्यांचे पालक ज्याप्रमाणे शिक्षा करायचे, तशी शिक्षा ते आपल्या मुलांना करत नसल्याचं अनेकवेळा सांगत असतात. पण आताची मुलंही इतकी हुशार आहेत की, ती पालकांनी शिक्षा करायची वेळच येऊ देत नाहीत. पण त्यातही पालकांनी काही जबरदस्ती केलीच तर काय होतं, याचं एक ताज उदाहरण समोर आलं आहे. ते ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल आणि हसूही येईल.
कारण, एका लहान मुलाला आईने अंघोळ करायला लावली म्हणून त्याने चक्क पोलिसांना घरी बोलवून घेतल्याची घटना उघडकी आली आहे. लहान मुलं त्यांच्या निरागसतेसाठी ओळखली जातात पण ती कधी काय करतील याचा अंदाजही आपणाला लावता येत नाही. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने खूप थंडी पडतं आहे. अशा परिस्थितीत अंघोळ करणे हे सर्वात कंटाळवाणे काम असतं. शिवाय थंडीमुळे पाण्याजवळ जायलाही लोक नको म्हणत असतात.
हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल
अशा कडाक्याच्या थंडीत मुलाला अंघोळ करायला सांगितल्यामुळे एका आईच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, आईने मुलाला थंड पाण्याने अंघोळ करायला सांगितल्यावर मुलाने चक्क पोलिसांना फोन लावल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील आहे. येथील एका गावात एका ९ वर्षांच्या मुलाने ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावलं. पोलिस अचानक घरी आल्याने सर्वजण थक्क झाले. तर पोलिस ज्यावेळी या लहान मुलाच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना हसू आवरण कठीण झालं होतं.
हेही पाहा- Video: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकसमोर अचानक आला बाईकस्वार, पुढे जे घडलं ते पाहून थक्क व्हाल
कारण, जेव्हा पोलिस या मुलाच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना सर्व परिस्थिती समजली. या मुलाने आपल्या आईबाबतची तक्रार पोलिसांना सांगितली की, आईने मला थंडीत अंघोळ करायला सांगितली होती पण थंडीत अंघोळ करायची मला भीती वाटते. नऊ वर्षांच्या मुलाने त्याच्या आई-वडिलांविरोधात पोलिसांकडे तक्रार करताना सांगितले की, ‘आई-वडील मला माझ्या स्टाईलने केस कापून दिले नाहीत आणि आता ते मला या थंडीत अंघोळ करायला सांगत आहेत.’ आई-वडिलांच्या या जबरदस्तीमुळे तो संतापला आणि त्याने पोलिसांना फोन लावल्याचंही त्याने सांगितलं. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सध्याची जनरेशन फार पुढं गेली असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.