scorecardresearch

Premium

Video: धावत्या बसमध्ये गिअरची दोरी प्रवाशाच्या हातात, ड्रायव्हरचा खतरनाक जुगाड, प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला

Viral video: जुगाड केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Up roadways drivers mind will wander seeing the jugaad the gear of the moving bus video viral on social media
युपीमधील ड्रायव्हरचा खतरनाक जुगाड

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे कोणीचं सांगू शकत नाही. रोज नवे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. लोकांना आवडलेले व्हिडीओ शक्यतो मिलियनमध्ये पाहिले जातात असं आतापर्यंत पाहण्यात आलं आहे. काही लोकांनी घरातील सामान वापरुन हेलीकॉप्टर तयार केलं आहे. काही लोकांनी घरगुती सामान वापरुन इलेक्ट्रीक स्कुटर तयार केली आहे. जुगाड केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.सध्या एक अशाचं पद्धतीचा जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो जुगाड पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ युपीच्या रोडवेजमधील बसचा आहे. त्यामध्ये बसच्या चालकाने जुगाड केला आहे.

ड्रायव्हर आणि कंडक्टरचा हा अनोखा जुगाड पाहून बसमधील प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. एका प्रवाशांने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी महामंडळाच्या कारभारावर टीका केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चालकाने जुगाड केला आहे. चालकाने गिअरला दोरी बांधली आहे. त्याचबरोबर ती दोरी मागे बसलेल्या प्रवाशाच्या हातात दिली आहे. मागे बसलेला व्यक्ती घोडा गाडीत बसल्यासारखा वाटतं आहे. तो प्रवासी फार गंभीर चेहरा करुन बसला आहे.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: पठ्ठ्यानं मगरीच्या जबड्यात घातला पाय, क्षणात मगरीनं पाय पकडला अन् तरुणाचा नको तो शहाणपणा अंगलट

 हा व्हिडीओ जुना आहे, परंतु सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी चालकाचं कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 16:15 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×