सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज दिल्ली मेट्रो एका खास कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, मेट्रोतील आजचा व्हिडीओ पाहून तुमचा संताप न होता, तुम्ही कौतुक कराल. अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदी नियुक्ती करण्यात आलेले एरिक गार्सेट्टी (Eric Garcetti) हे दिल्लीत आले होते. तसेच यादरम्यान त्यांनी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला आणि त्यांचा अनुभव शेअर केला आहे. तसेच दिल्ली मेट्रोचे खास शब्दांत त्यांनी कौतुकसुद्धा केले आहे; जे सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सुरुवातीला व्हिडीओत ते स्मार्ट कार्ड दाखवीत “दिल्ली मेट्रो, मेरा मेट्रो”, असे म्हणताना दिसले. त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबर एरिक गार्सेट्टी दिल्ली मेट्रो स्टेशनवर प्रवेश करतात. त्यानंतर ते स्मार्ट कार्ड मशीनवर ठेवतात आणि मेट्रोत प्रवेश करतात. प्रवासारम्यान ते प्रवाशांशी गप्पागोष्टी करताना आणि संवाद साधतानाही दिसले. तसेच अनेक तरुण मंडळींनी त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी घेतले. राजदूत एरिक गार्सेट्टी यांचा ‘दिल्ली मेट्रो प्रवास’ एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

Riot manipur
अमेरिकेचा भारताबाबतचा अहवाल अत्यंत पक्षपाती; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खंडन 
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
What are the charges against Israel Netza Yehuda Battalion
यहुदी तालिबानʼवर अमेरिकाही नाराज… इस्रायलच्या नेत्झा यहुदा बटालियनवर कोणते आरोप आहेत?
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

हेही वाचा…निस्वार्थ प्रेम! आजी आजोबांनी नातवंडांसाठी गावावरून आणला खाऊ, लोकलमधील Video Viral

पोस्ट नक्की बघा :

व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी मेट्रोत गुडघ्यावर बसून आई आणि एका चिमुकल्याशी संवाद साधताना दिसले. तसेच अनेक महिलांबरोबर त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढून घेतला. तसेच ते मेट्रोत उपस्थित प्रवाशांशी हात मिळवून संवाद साधताना दिसले. काही पोलिस अधिकारीसुद्धा त्यांच्यासोबत मेट्रोत होते. तसेच काही प्रवासी हा क्षण त्यांच्या मोबाईलमध्ये टिपून घेताना दिसले. एकंदरीतच राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी दिल्ली मेट्रोतील सर्व प्रवाशांशी मनमोकळेपणे संवाद साधला.

राजदूत एरिक गार्सेट्टी यांच्याकडून दिल्ली मेट्रोचे कौतुक :

अमेरिकेचे भारतातील राजदूत गार्सेट्टी यांनी दिल्ली मेट्रोचा प्रवास एका व्हिडीओतून शेअर केला आहे. तसेच व्हिडीओ शेअर करून लिहिले, “व्वा! दिल्ली मेट्रो, तुम्ही प्रवाशांचा प्रवास खूप सोपा करता. मला पहिल्यांदा दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना आणि प्रवाशांना भेटताना खूप आनंद झाला. जगातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थेपैकी एक असलेली कार्यक्षम आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशा शब्दांत त्यांनी दिल्ली मेट्रोचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ राजदूत गार्सेट्टी यांच्या अधिकृत @USAmbIndia या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण राजदूत गार्सेट्टी यांच्या स्वभावाचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून येत आहेत.