हवामान निरिक्षक टॉम पॅडहॅम यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. उणे ४० अंश सेल्शिअस तापमान आणि ताशी १०५ मैल प्रतिवेगाने वारे वाहत असतानाही हा हवामान निरिक्षक वाऱ्याशी झुंजत बाहेर उभा होता. वाऱ्याच्या वेगानं टॉमला उभंही राहता येत नव्हतं, हा वेग इतका तीव्र होता की टॉम वाऱ्याच्या तडाख्याने मागे ढकलले जात होते. तरीही त्यानी आपलं काम थांबवलं नव्हतं.
Video : दोन वर्षांच्या मुलीने पहिल्यांदा आईला बघितले; आईची प्रतिक्रिया बघून व्हाल भावूक
Viral Video : आलिया, सनी लिओनचा डान्स तिच्यासमोर पडला फिका
माऊंट वॉशिंग्टन इथला हा व्हिडिओ आहे. हवामानाची सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी टॉम तिथे पोहोचले होते. वाऱ्याचा वेग आणि इथलं तापमान दाखवण्यासाठी त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतलं होतं. पूर्ण तयारीनिशी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी टॉम बाहेर पडले खरे पण वाऱ्याच्या वेगापुढे त्यांचा फार काळ निभाव लागला नाही, त्यामुळे काही मिनिटांत त्यांना आपल्या खोलीत परतावं लागलं. या ठिकाणी हिवाळ्यात वाऱ्याचा वेग नेहमीच जास्त असतो. ९० वर्षांपूर्वी ताशी २३१ मैल वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची विक्रमी नोंद करण्यात आली होती.