Viral Video Today: खऱ्या आयुष्यात स्पायडरमॅनची शक्ती कोणाला मिळाली तर? काय काय करता येईल स्पायडर.. माणसाला? तुम्हालाही कधी असा प्रश्न पडला आहे का? असेल तर त्याचं उत्तर या सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सापडेल. अलीकडेच सोशल मीडियावर एक २२ वर्षीय तरुणाचा एका उंच टॉवरवर चढतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या तरुणाने कोणतीही सुरक्षा केबल किंवा साधी दोरीही बांधलेली नाही. हा चमत्कार पाहून नेटकरी पार हादरून गेले आहेत. प्रत्येकजण हा या तरुणाने नेमकं काय तंत्रज्ञान वापरलंय हेच शोधण्यात गुंतला आहे.

AFP च्या माहितीनुसार हा जगातील एकमेव असा तरुण आहे ज्याने आजवर ‘फ्री सोलो’ अशा टॅगखाली अनेक टॉवर्स हे अक्षरशः घरातील जिन्याच्या पायऱ्या चढाव्यात इतक्या सहजतेने पार केले आहेत. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा १२२ मीटर उंच टॉवरवर चढतानाचा आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मी हे चॅलेंज टॉम क्रूजला देऊ इच्छितो, त्याने हे मिशन इम्पॉसिबल पूर्ण करून दाखवावं. तसं आजच्या या चढाईच्या वेळी हवामान फारच सुंदर होतं. गार हवा जास्त होती पण यामुळेच ही चढाई जरा आणखीन साहसी झाली आहे.

खऱ्या आयुष्यात स्पायडर मॅन..

हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून याला ६ लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत तर ३१ हजाराहून अधिक लाईक्स आहेत. काहींनी या व्हिडिओवर कमेंट करून तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर काहींनी त्याला बाबा रे हे थांबावं एक छोटी चूक झाली तरी जीव जाईल असा काळजीचा सल्ला दिला आहे. अनेकांनी तर कमेंटमध्ये फक्त काय गरज आहे? एवढाच प्रश्न केला आहे.

हे ही वाचा<< Video: गौतमी पाटीलच्या ‘त्या’ लावणीमुळे पुन्हा झाला राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्..

खरं पाहायचं तर सोशल मीडिया युजर्सची काळजी खरी आहे. एक आवड म्हणून हे साहस समजू शकतो पण यात काहीच अर्थ नाही. केवळ कोणाला इम्प्रेस करण्यासाठी किंवा काही लाईक्स साठी जीवाशी खेळणं निरर्थक आहे. अशा प्रतिक्रिया सध्या या व्हिडिओवर येत आहेत. तुम्हीही हा आदर्श घेऊन असे उद्योग करायला जाऊ नका. पण या तरुणाचे साहस कसे वाटले हे कळवायला विसरू नका.