एका बीएसएफ जवानाचा कडक थंडीच्या वातावरणात कसरत करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या थंडीत ४० हून अधिक पुश-अप्स पूर्ण करतानाचा त्याचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. बर्फवृष्टीच्या वेळी असे धाडस दाखवणे प्रत्येकालाच जमत असं नाही. उंच डोंगरावर बर्फवृष्टी दरम्यान, बर्फात उघड्या हातांनी पुश-अप करणे सोपे नसते.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) च्या अधिकृत ट्विटर अंकाऊटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय जवान पूर्णपणे बर्फाच्छादित जमिनीवर अवघ्या ४० सेकंदात ४७ पुश-अप पूर्ण करताना दिसत आहे.

(हे ही वाचा: एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; ड्रायव्हरचा यू-टर्न घेतानाचा Video Viral)

(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral)

नेटीझन्स झाले आश्चर्यचकित

बीएसएफच्या (BSF) अधिकृत ट्विटर अंकाऊटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. बर्फाच्छादित भागात कसरत करणाऱ्या जवानाची ही क्लिप पाहणे केवळ अविश्वसनीयच नाही तर तुम्हाला आश्चर्यचकित देखील करू शकते. व्हिडीओमध्ये लष्कराचा एक जवान पूर्णपणे बर्फाच्छादित जमिनीवर पुश अप करत आहे. जवानाने अवघ्या ४० सेकंदात ४७ पुश अप केले, ज्याचा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये उल्लेख आहे. व्हिडीओचे कॅप्शन लिहिले आहे, ‘४० सेकंद, ४७ पुश अप, पुढे जा #FitIndiaChallenge.’

(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral)

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ ३ राशींच्या लोकांचे स्वभाव मानले जातात अतिशय नम्र!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिट इंडिया चॅलेंज

फिट इंडिया चॅलेंज भारतीय नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात शारीरिक क्रियाकलाप आणि खेळ समाविष्ट करून निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहित करते, जो फिट इंडिया मूवमेंटचा एक भाग आहे. या व्हिडीओने लोकांना आश्चर्यचकित केले आहे आणि इतक्या कमी वेळेत जवानाला चॅलेंज देताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एका युजरने लिहिले, ‘ #BSF जवानाची उणे डिग्री तापमानात #FitIndia क्षणासाठी मोठी प्रेरणा, आज तो लाखो ‘जय हो’साठी प्रेरणा बनला आहे.