देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून रॅली अन् प्रचार सभांचा धुमधडाका सुरु आहे. यातच सोशल मीडियावर राजकीय पक्षाच्या रॅलीदरम्यान महिलेशी असभ्य वर्तन झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ भाजपाच्या निवडणूक रॅलीदरम्यानचा असून यात दिसणारी महिला ही अभिनेत्री कंगना रानौत आहे. रॅलीदरम्यान राजकीय नेत्याने अभिनेत्रीबरोबर असभ्य वर्तन केल्याचे यात म्हटले आहे, पण व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून केलेला जाणारा दावा खरा आहे की खोटा आपण सविस्तर जाणून घेऊ..

काय होत आहे व्हायरल?

एक्स यूजर Nidhi Sharma ने हा व्हिडिओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

इतर युजर देखील हा दावा करत व्हि़डीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि कीफ्रेम मिळवून आमचा तपास सुरू केला. आम्ही सर्व कीफ्रेम वर एक-एक करून रिव्हर्स इमेज सर्च केल्या.

आम्हाला farhanrmc1 च्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ १३ वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता आणि जो १० लाख लोकांनी पाहिला होता. त्यातून असे सूचित होते की, हा व्हायरल व्हिडीओ अलीकडील नाही.

व्हिडीओवरील एका कमेंटमध्ये म्हटले आहे की, व्हिडीओमधील व्यक्ती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आहेत.

डेलीमोशनच्या वेबसाइटवरही आम्हाला हा व्हिडीओ सापडला.

कॅप्शनमध्ये ‘पी. एम. घेलानी आणि शेरी रहमान स्कॅण्डल’ असा उल्लेख होता.

आम्हाला एका वेबसाइटवर हा व्हिडीओ सापडला; तो पाहिल्यावर हा व्हिडीओ जुना असल्याचे स्पष्ट होतेय.

https://defenceforumindia.com/threads/pakistani-prime-minister-gilani-groping-sherry-rehman.40123/

कमेंट बॉक्समध्ये शेअर केलेल्या व्हिडीओच्या शीर्षकात असे लिहिले आहे, “युसुफ रझा गिलानी यांनी एका राजकीय सभेत शेरी रहमान यांच्या स्तनाला केला स्पर्श’.

आम्हाला या घटनेबाबत काही बातम्याही मिळाल्या.

https://www.bhaskar.com/news/int-yousaf-raza-gilani-pressing-sherry-rehman-breast-2932387.html

theguardian.com वरील बातमीतही या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे.

https://www.theguardian.com/music/musicblog/2008/sep/05/relaxleaveeverythinginalla

निष्कर्ष

व्हायरल व्हिडीओत करण्यात आलेला दावा खोटा आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील जुना व्हिडीओ असून, त्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी तत्कालीन माहिती मंत्री शेरी रहमान यांच्याशी असभ्य वर्तन केले होते. हाच व्हिडीओ आता भारतातील भाजपच्या रॅलीचा असल्याचे सांगून, मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. तसेच यातील महिला अभिनेत्री कंगना रनौत असल्याचा दावादेखील खोटा आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडीओतून करण्यात आलेले दावे खोटे असून, हा व्हिडीओ भारतातील नाही.