Emergency Landing of Plane on Highway Video: आजवर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत विमानाचे लँडिंग झाल्याचा अनेक बातम्या आपणही ऐकल्या असतील. अशावेळी विमानतळ जवळ नसल्यास मोकळ्या मैदानात किंवा ओसाड ठिकाणी विमानाचे लँडिंग केले जाते पण सध्या समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये एका पायलटने चक्क एका हायवे वरच विमान उतरवल्याचे समजत आहे. CNN च्या माहितीनुसार, पायलट विमान उडवत असताना त्या विमानात पॅसेंजर सीटवर त्याचे सासरे सुद्धा बसले होते.

ग्रेट स्मोकी माउंटन्स याभागावरून जाताना अचानक सिंगल इंजिन विमानात पायलटला बिघाड जाणवला. साहजिकच अशावेळी सगळेच गांगरून गेले होते. पण आपल्याला आपल्या सासऱ्यांच्या आणि सगळ्याच प्रवाशांचा जीव वाचवायचा आहे असा विचार करून पायलटने अचानक नॉर्थ कॅरोलिना येथील चौपदरी हायवेवर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. या लँडिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आश्चर्य म्हणजे जेव्हा लँडिंग झाले तेव्हा त्या हायवेवर गाड्यांची भरपूर वर्दळ होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विन्सन्ट फेसर नामक या पायलटने CNN ला सांगितल्याप्रमाणे, तो मुळात विमान नदीत उतरवण्याच्या विचारात होता पण अचानक सुदैवाने त्याला हाय वे दिसला आणि त्याने एकाही गाडीचे नुकसान न करता सुरक्षितरित्या विमानाचे लँडिंग घडवून आणले. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करून जेव्हा नशीब बलवत्तर असते आणि तुमचे काम चोख असते तेव्हा कुठल्याही संकटात तुम्ही टिकून राहू शकता असे कॅप्शन व कमेंट लिहून नेटकरी ही पोस्ट व्हायरल करत आहेत. ही घटना अलीकडची नसून २२ जुलै २०२२ मधील असल्याचे समजतेय पण हा व्हिडीओ आता नव्याने व्हायरल होत आहे.