Viral Video: टीव्हीवर दिसण्याचं कौतुक प्रत्येकालाच असतं. तुमचं काम एका क्षणात जगभरात पोहचवण्याचं काम या इवल्याश्या बॉक्समधून होत असतं. पण नुसतं चांगले कपडे घालून, मेकअप करून कॅमेरासमोर उभं राहायचं हे इतकंच काम नसतं. तर अनेक आयत्यावेळी येणाऱ्या समस्यांवर त्वरित विचार करून तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे कसब सुद्धा टीव्हीवर दिसणाऱ्याच्या अंगी असावं लागतं. आपल्या अशाच एक त्वरित प्रतिक्रियेने एक कॅनडियन वार्ताहर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या महिलेने चक्क लाईव्ह टीव्हीवर एक माशी गिळल्याचा व्हिडीओ ऑनलाईन पाहायला मिळतोय.
झालं असं की, वार्ताहर फराह नासेर या प्रेक्षकांना, “पाकिस्तानने मान्सूनचे असे अखंड चक्र कधीही पाहिले नाही. आठ आठवडे मुसळधार पाऊस व पूर या परिस्थितीत देशात राष्ट्रीय आणीबाणी लादण्यात आली आहे अशी माहिती देत होत्या. इतक्यात ‘Invoked’ हा शब्द म्हणताना त्या मध्येच अडखळल्या. तेव्हा लक्षात आलं की त्या बोलत असताना एक माशी त्यांच्या तोंडात शिरली. कॅमेरा सुरु असल्याने त्यांना थांबणे शक्य नव्हते म्हणून नासेर यांनी त्या माशीला गिळून वाक्य संपवलं. हा व्हिडीओ स्वतः नासेर यांनीच ट्विटरवर शेअर केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; इतक्यात एक चिमुकला आला अन..पाहा थरकाप उडवणारा क्षण
या व्हिडिओला आतापर्यंत ९९. ४ हजार व्ह्यूज आणि १६०० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट करून नासेर यांच्या तत्परतेचे कौतुकही केले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच, “माझ्याजागी दुसरं कोणी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं, लोकांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हास्य आलं यात समाधान, आणि त्या माशीच्या आत्म्याला शांती मिळो” असे नासेर म्हणाल्या.