Gautami Patil Award: गौतमी पाटीलच्या लावणीचा वाद हा मागील काही काळात महाराष्ट्रात सर्व स्तरात चर्चेचा मुद्दा ठरला होता. अगदी सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी, कलाकार ते सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर पर्यंत अनेकांनी गौतमीचा वाद कसा महाराष्ट्रातील लावणी कलेला घातक आहे यावर भाष्य केले होते. गौतमीला अश्लीलतेचा टॅग देण्याच्या बातम्या आजवर समोर आल्या पण आज स्वतः गौतमीने आपल्याला मायभूमीतून कौतुकाची थाप मिळाल्याचे सांगत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते आज गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ म्हणून गौरव करण्यात आला आहे.
खान्देश कन्या पुरस्कारावर काय म्हणाली गौतमी?
गौतमी पाटील म्हणाली की, “माजी मंत्री तथा आमदार मा. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मा. श्री. जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देश कन्या म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला.त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देश!”
हे ही वाचा<< गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; खऱ्या आयुष्याबद्दल गौतमी म्हणते, “मी खूप..”
गौतमी पाटील विरुद्ध अजित पवार
दरम्यान काही दिवसांपूर्वी गौतमीच्या लावणीवर स्वतः अजित पवार यांनी सुद्धा आक्रमक प्रवित्रा घेतला होता. लावणी किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सर्वांना पाहता येतील, अशा प्रकारे आयोजित केले पाहिजे. अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील प्रकार घडता कामा नयेत. काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांवर बंदी आहे. पण काही जिल्ह्यात असे कार्यक्रम सुरू आहे. मी संबंधितांशी बोलणार आहे. वेळ पडली तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात हा मुद्दा उपस्थित करणार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती. यावर गौतमीने दादा मला माफ करा, मी या आधी चुकले पण पुन्हा असं करणार नाही म्हणत अजित पवारांची माफी मागितली होती.