सोशल मीडियावर कंटेट नेमका कसा आणि कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. कधी जंगलामधील व्हायरल व्हिडीओ तर कधी ऑप्टीकल इल्यूजनसंदर्भातील फोटो. कधी डान्सचे रिल्स तर कधी उपयुक्त टीप्सचे व्हिडीओ. अनेकदा मिम्सबरोबरच हल्ली छोट्या छोट्या कालावधीचे मजेदार रिल्सही चर्चेत असल्याचं दिसत. या रिल्सचा लाखोंच्या संख्येने व्ह्यूज असतात. त्यातही किचन टीप्स किंवा घरगुती कामासंदर्भातील क्लुप्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

कोणी शेअर केला आहे व्हिडीओ?

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ गुजर नावाच्या पुणेकर व्यक्तीने शेअर केला आहे. सिड फ्रॉम पुणे नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये नारळ कसा फोडावा याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे. मात्र हे प्रात्यक्षिक किचनमध्ये वगैरे दाखवण्यात आलं नसून थेट इमारतीच्या लॉबीमध्ये दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे नारळ फोडण्यासाठी हातोडी किंवा लोखंडी रॉडऐवजी थेट लिफ्टचा वापर करण्यात आल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये लिफ्ट लागते त्या ठिकाणी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नारळ ठेवलेला दिसतोय. लिफ्टचं दार बंद होतं तसं त्या प्लास्टिकच्या पिशवीचे बंद लिफ्टच्या दारात अडकतात आणि नारळ लिफ्ट वर जाते त्याप्रमाणे पिशवीसहीत वर जातो. त्यानंतर लिफ्टच्या फ्रेमला अडकून नारळ खाली पडतो आणि फुटतो. अडकलेली प्लास्टिकची पिशवी मात्र लिफ्टबरोबर वर जाते.

नक्की पाहा >> कहर! फलंदाजांच्या नादात पाकिस्तानी विकेटकीपरच दोन धावा पळाला; सामन्यातील मजेदार Video होतोय Viral

कॅप्शन चर्चेत

आता हा विचित्र पद्धतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कॅप्शनचीही चांगलीच चर्चा सोशल मीडियावर आहे. हे तंत्रज्ञान देशाच्या बाहेर जाता काम नये, अशी कॅप्शन या व्हिडीओला सिद्धार्थने दिली आहे.

नक्की पाहा >> अरुंद उतारावर जागच्या जागी गाडी वळवण्याचा प्रयत्न अन्…; २ कोटी Views, ६१ हजार Shares असलेला Video पाहिला का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला ८७ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांनी यावर अशाप्रकारे वापर केल्यास लिफ्ट खराब होईल असं म्हटलं आहे.