Housequeen Marathi Video: युट्युब हे करिअरचं क्षेत्र म्हणून निवडणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आपल्या सोयीनुसार काम करण्याची मुभा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणारं हे माध्यम सर्वच वयोगटातील व्यक्तींना आकर्षित करत आहे. विशेषतः या माध्यमातून गृहिणींना सुद्धा आपली आवड जपण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. याच संधीचं सोनं केलेल्या एका युट्युबरची आम्ही नुकतीच भेट घेतली. लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सरच्या जगात या सीरीजमध्ये गप्पा मारताना हाऊसक्वीन (Housequeen) धनश्री पवार हिने आपल्या यूट्यूबच्या प्रवासात शिकलेल्या काही खास गोष्टींचा उलगडा केला आहे. २०२३ मध्ये सुद्धा समजा नव्याने युट्युब चॅनेल सुरु करण्यास सांगितलं तर कोणत्या चार गोष्टी लक्षात ठेवून व्हिडीओ अपलोड करायला हवेत आणि शून्यापासून लाखांपर्यंत सबस्क्राइबर्स कसे न्यायला हवेत हे तिने यातून सांगितले आहे.
धनश्री पवार ही मागील सहा वर्षांपासून युट्युबवर हाऊसक्वीन या नावाने व्हिडीओ अपलोड करते. २ लाख १८ हजार सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठताना तिने लाइफस्टाइल, मेकअप, फॅशन, कुकिंग आणि बरंच काही अशा कॅटेगरी मध्ये आपले व्हिडीओ बनवले होते. या प्रवासात तिच्या चाळीतल्या घराने, घरातील मंडळींनी तिची कशी साथ दिली याविषयी सुद्धा धनश्रीने उलगडा केला आहे. तिच्या या गप्पा ऐकण्यासाठी खालील व्हिडीओ आवश्य पाहा..
Video: हाऊसक्वीन (Housequeen) धनश्री पवार
हे ही वाचा<< Video: मातीची भांडी वापरताना, स्वच्छ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच! ‘Red Soil Stories’ च्या पूजाचं गुपित
आजपर्यंत आपण लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘इन्फ्लुएन्सरच्या जगात’ या सीरीजला प्रचंड प्रेम दिले आहे, हेच पुढेही कायम असू द्या. भविष्यात तुम्हाला कोणत्या इन्फ्लुएन्सर्सच्या आयुष्याविषयी, प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा.