Bike Jugaad Video Viral: बॉलिवूडमध्ये आपण अनेक अविश्वसनीय गाड्यांच्या डिझाईन पाहिल्या असतील. कधी साधी बाईक पण इतकी भन्नाट जुगाडू पद्धतीने दाखवली जाते की आपण जे पाहतोय ते खरं आहे का असा प्रश्न डोक्यात येतोच. काही वेळा या चार पाच चाकांच्या बाईक दाखवण्यासाठी तांत्रिक जादू वापरली जाते पण तुम्हाला माहित आहे का एका पठ्ठ्याने हा जुगाड प्रत्यक्ष करून दाखवला आहे. स्प्लेंडर बाईकला जुगाड करून त्याने असा भन्नाट लुक दिला आहे की तुम्हीही बघतच राहाल. तुम्हाला हा जुगाड पाहून गोलमाल चित्रपटातील बाईक आठवते का हे कमेंट मध्ये नक्की कळवा. आता हा प्रकार नेमका काय आहे चला पाहूया…
तुम्ही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एका तरुणाने Splender च्या बाईकच्या दोन टायर्सच्या नंतर आणखी एक टायर जोडला आहे. @no_1_naveen_bike_165 या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. व्हायरल झाल्यापासून या व्हिडीओला १० कोटीहून अधिक व्ह्यूज व ६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांनी चक्क पंतप्रधान मोदींकडे भलतीच मागणी केली आहे.. त्याआधी हा व्हिडीओ काय आहे हे ही पाहूया…
Splendor बाईकचा भन्नाट जुगाड, पाहा Video
हे ही वाचा<< पाण्याची टाकी रिकामी न करता कशी स्वच्छ करायची? तरुणाचा जुगाडू Video पाहून म्हणाल, “भाई पैसे वाचले”
दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी काही मजेशीर कमेंट सुद्धा केल्या आहेत. एकाने तर चक्क हा व्हिडीओ पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाईकला थेट वंदे भारत एक्सप्रेस असं नाव द्यावं अशीही कमेंट केली आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटतो हे कमेंट करून नक्की कळवा.