Heart Attack While Warming Up At Gym: ब्रिटनमध्ये कोरोना लसीबाबत झालेल्या खुलाशांच्या दरम्यान, वाराणसीमध्ये जिम करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणे, जी सावरण्याची संधीही देत ​​नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे.यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचाही व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावलेल्या अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. दरम्यान अशीच एक घटना समोर आली आहे. वाराणसीमध्ये जीममध्ये व्यायाम करत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून जीममध्ये व्यायाम करताना तुम्हीही ही चूक करत नाही ना हे जरुर पाहा.

जिममध्ये वॉर्मअप करत असताना कोसळला

बदललेल्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.वाराणसीमध्ये जिम करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दहा वर्षांपासून जिम करत असलेला हा तरुण जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर पडला आणि काही काळाने त्याचा मृत्यू झाला. याआधी त्याला ब्रेन हॅमरेज झाला होता, असे सांगण्यात येते.

वाराणसीमधील पियारी (चेतगंज) येथील रहिवासी ३२ वर्षीय दीपक गुप्ता १० वर्षांपासून जिममध्ये जात होता. नेहमीप्रमाणे मंगळवारीही तो सिद्धगिरी बागेत असलेल्या जिममध्ये पोहोचला. त्याने वेट ट्रेनिंगआधी वॉर्म-अप सुरू केले व अचानक तो जमिनीवर पडला आणि वेदनेने तळमळू लागला. तेथे उपस्थित असलेले इतर तरुण आणि प्रशिक्षक घाईघाईने त्याला घेऊन महमूरगंज येथील रुग्णालयात धावले. तेथे डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले.

जास्त व्यायाम हृदयासाठी धोकादायक

कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार जिममध्ये तो ३ तासांपेक्षा जास्त वेळ घालवायचा. व्यायाम सर्वांसाठी जरूरीचा आहे; पण व्यायामाच्या पद्धती योग्य असाव्यात. व्यायाम करणे चांगले असले, तरी जास्त व्यायाम हृदयासाठी धोकादायक आहे. अति व्यायामामुळे हृदयाची गती वाढून त्या व्यक्तीला ‘सडन कार्डिअॅक अरेस्ट’ येण्याची शक्यता असते. त्याला अचानक आलेला हृदयविकाराचा झटका असेही म्हटले जाते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “भाजप येणार? काँग्रेस येणार? आरं खुळ्या…” निवडणुकांच्या रणधुमाळीत व्हायरल होणारं ‘हे’ पोस्टर पाहून पोट धरुन हसाल

हृदयविकाराचा धोका कसा टाळाल?

जास्त व्यायाम करू नका, तंदुरुस्त राहा त्यामुळे आठवड्यातून काही दिवस व्यायाम करायला हरकत नाही. बैठी जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपण सक्रिय असणे आवश्यक आहे. जर तुम्ही डेस्क जॉब करत असाल तर दर १ तासाने उठून थोडे चालत जा.