Viral Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रिल्स बनवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषेतील विविध देशातील नवनवीन गाणी व्हायरल होतात. ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे तर, ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. गेल्यावर्षी नेपाळच्या ‘बादल बरसा बिजुली’ या गाण्याने देखील सोशल मीडियावर अनेकांना वेड लावले होते. या गाण्यावर लाखो रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दरम्यान, आता देखील या गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक लहान चिमुकला हे गाणं स्वतः गाताना दिसत आहे.

हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात, अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की ते त्यांच्या नेहमीच तोंडपाठ असते. अनेकदा शाळेत शिकवलेल्या कविता त्यांच्या लक्षात राहत नाहीत पण रील्समधील गाणी ते नेहमी पटापट बोलतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील असाच लहान गोड मुलगा गाणं गाताना दिसतोय ज्याला पाहून नेटकरी त्याचे प्रचंड कौतुक करत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ नेपाळमधील असून या व्हिडीओतील मुलगा एका सुंदर नयनरम्य परिसरात बसलेला दिसतोय त्या मुलाच्या मागे गुलाबी रंगाची सुंदर फुलं आणि धुके पसरलेले दिसत आहेत. शिवाय त्या मुलाकडे पाहिले तर तोही तितकाच गोड आहे. त्याने त्याच्या कानात एक गुलाबी फुल देखील अडकवलेले आहे. शिवाय तो प्रसिद्ध ‘बादल बरसा बिजुली’ गाणं अगदी जमेल तसं सूर लावून गात आहे. यावेळी तो गाण्यासोबतच कमालीचे एक्सप्रेशन देखील देत आहे. अनेकजण त्याच्या गाण्यापेक्षा त्याच्या एक्सप्रेशनचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा: याला म्हणतात डोकं! तरुणीने बनवलं चक्क जंगलात घर; VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ani5h_7 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय याला सहा लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसेच अनेकजण यावर कमेंट्स देखील करताना दिसत आहे. यातील एकाने लिहिलंय की, “भाऊ तू नक्की कुठे आहेस किती छान जागा आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “तू आणि तुझ्या मागची जागा दोनीही खूप सुंदर आहे”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “बाळा तुझे एक्सप्रेशन खूप छान आहेत”. तर आणखी एकाने त्याच्या गाण्याचे कौतुक केले आहे.