Man Attacked By King Kobra Viral Video: जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो त्यात अनेकदा तो स्वतःच पडतो अशी एक म्हण आहे. आपल्याला केलेल्या सर्व कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. याच वाक्यांचा थेट प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील व्यक्तीला आला असावा. ही व्यक्ती एका कोब्रासामोर आपला मोठेपणा मिरवायला गेली खरी पण त्याचा सगळा खेळ असा काही उलट फिरला की जे पाहून आपलाही थरकाप उडेल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की एक व्यक्ती चक्क एका कोब्राला बंदुकीची गोळी मारण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यानंतर काहीच क्षणात जे काही घडलं ते बघून नेटकऱ्यांच्या जीवाचंही पाणी पाणी होत आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता जमिनीवर एक कोब्रा फणा काढून बसलेला दिसतो आहे. समोर गाडीत एक व्यक्ती बसली आहे. जिने हातात बंदूक धरली आहे. ती व्यक्ती त्या सापावर बंदुकीतून गोळ्या झाडते. एकामागोमाग अशा तीन गोळ्या ती झाडते. या कोब्राचं नशीब जोरदार असल्याने त्याला एकही गोळी लागत नाही. पण गोळ्यांचा आवाज ऐकून कोब्रा प्रचंड चिडतो आणि थेट त्या व्यक्तीवरच हल्ला चढवतो.
मायक्रो-ब्लॉगिंग साइट Twitter वर “इन्स्टंट कर्मा” नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. “कोब्राशी लढण्यासाठी बंदूक आणू नका.” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Video: किंग कोब्रा खवळला
हे ही वाचा<< पैशांचा पाऊस! ‘या’ कंपनीने ४० कर्मचाऱ्यांना दिला ७० कोटींचा बंपर बोनस; नोटांचे बंडल उचलताना झाली दमछाक
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांनी अनेक संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. माणूस हा प्राणी अत्यंत निर्लज्ज आणि निर्दयी कसा असू शकतो हे याचं उदाहरण आहे असेही काहींनी कमेंटमध्ये म्हंटले आहे. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करायला जाल तर अशीच अवस्था होईल असे म्हणत नेटकऱ्यांनी या व्यक्तीवर टीका केली आहे.