नासा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नेहमीच फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत असतात. व्हिडीओ, फोटो बघून आपल्याला अनेकदा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. माहिती वाचून तर अनेक प्रश्न आपल्या डोक्यात हमखास येतात. अशाच एका ‘कॉस्मिक रोझ’ दाखवणाऱ्या नासाच्या या ताज्या पोस्टने अनेकांना भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत किंवा मूळ पोस्ट खाली मित्रांना टॅग करत व्हिडीओ व्हायरल केला आहे. बाह्य अवकाशातील या व्हिडीओला बघून तुम्हालाही नक्कीच कुतूहल वाटेल.

इन्स्टाग्रामवर @asnasahubble या अकाऊंटद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दोन आकाशगंगा त्यांच्या परस्पर गुरुत्वाकर्षणामुळे डीस्ट्रोइड झाल्याचे दर्शवितो आणि म्हणून गुलाबासारखा मोहक दृश्य तयार झालेलं दिसत. “तुमचा दिवस उज्ज्वल करण्यासाठी एक गोड कॉस्मिक रोझ” अशा सुरुवातीसह हे आश्चर्यकारक गॅलेक्टिक मास्टरपीस कसे तयार झाले हे स्पष्ट करणार पोस्टचे कॅप्शन आहे.

या पोस्टला आतापर्यंत ५० हजारापेक्षा जास्त लोकांनी पसंत केलं आहे. व्हिडीओमध्ये अँड्रोमेडा नक्षत्रात सुमारे ३०० दशलक्ष प्रकाश-वर्ष दूर असलेल्या अर्प २७३ , परस्परसंवादी आकाशगंगांची जोडी आहे.दोन आकाशगंगा त्यांच्या परस्पर गुरुत्वाकर्षणामुळे डीस्ट्रोइड झाल्याने गुलाबासारखा आकाशगंगा उत्कृष्ट नमुना तयार करतात. अंतराळ आणि वेळेपर्यंत पसरलेले, हे दृश्य हबल स्पेस टेलिस्कोपद्वारे कॅप्चर केल्याने परस्परसंवादी आकाशगंगेच्या जोडीचे एक अनन्य त्रि-आयामी दृश्य प्रदान करते.

नेटीझन्सची प्रतिकिया

व्हिडीओच्या सौंदर्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्यचकित केले आहे, अनेकांनी विश्वाच्या या आश्चर्यांचे कौतुक केले आहे. “धन्यवाद प्रिय हबल. हे खूप सुंदर आहे ”व्हायरल पोस्टवर एका वापरकर्त्याने टिप्पणी केली. दुसरा वापरकर्ता म्हणतो की, “या विश्वात आपण नक्कीच एकटे नाही” तिसरा कमेंट करतो की, “खूप सुंदर”. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर म्युझिकही ऐकायला मिळेल. या म्युझिकवरून “हा आकाशगंगेतला खरा आवाज आहे का?”, “असा आवाज येतो का?” असा प्रश्नही अनेकांनी कमेंट करून विचारला आहे.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?