Bus Flying On Ropeway: २०२२ मध्ये नितीन गडकरी यांनी उडत्या बसची घोषणा केली होती. पण आता नेपाळमध्ये हे तंत्रज्ञान अगोदरच वापरात आल्याचे दिसत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर नेपाळमधील एक भन्नाट जुगाड व्हायरल झाला आहे. यामध्ये चक्क एक बस प्रवाशांना घेऊन हवेत उडत आहे. एका डोंगरावरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जाड केबल्सच्या मदतीने एक रोप वे तयार करण्यात आला आहे ज्यावर चक्क एक बस उडताना दिसत आहे. अलीकडेच नेपाळमध्ये विमान दुर्घटनेमध्ये अनेकांनी जीव गमावले होते आणि त्यानंतर आता या उडत्या बसमधून पुन्हा एकदा लोकांचा जीव धोक्यात घालणारा स्टंट रोज केला जात आहे.

एका ट्विटर युजरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॅप्शनमधून या वाहतुकीच्या साधनाची माहिती दिली आहे. नेपाळ मध्ये सार्वजनिक वाहतूक अशीच होते असे कॅप्शन मध्ये लिहिलेले आहे. आपण पाहू शकता की एका जाड केबल व रश्शीच्या मदतीने बस दोन डोंगरांमधील दरी पार करते. दोन लोक बसच्या मागे उभे राहून ती नीट दरी पार करते का हे पाहण्यासाठी थांबले आहेत.

उडत्या बसचा Video झाला Viral

हे ही वाचा<< Video: भल्यामोठ्या मगरीला पायावर उचलून ‘तो’ भरवत होता जेवण; आधी ती शांत जेवली आणि मग..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बस ज्या दोन डोंगरांमध्ये हवेतून प्रवास करते तिथे खाली असणारी दरी फार खोल आहे. यापूर्वी इथे एक रस्ता होता पण दरी कोसळल्यावर पर्याय म्हणून अशा उडत्या बसचा मार्ग स्वीकारण्यात आला. एका अहवालानुसार, नेपाळमध्ये अनेकदा भूस्खलन होत असल्याने अनेक रस्ते बंद होत असतात अशावेळी हे असे जुगाड लोकांच्या कामी येतात पण खरंतर कितीही हुशारीने बनवलेले असले तरी हे जुगाड जीवघेणे सुद्धा ठरू शकतात.