Viral Video : ९० चं दशक हे भारतातील जागतिकीकरणाचं दशक मानले जाते. या काळात अनेक नवीन बदल दिसून आले. या दशकात जन्माला आलेल्या पिढीला मिलेनियल म्हणतात. या मिलेनियल लोकांनी खूप मोठी क्रांती बघितली. वस्तु, ठिकाणे, जीवशैली कशी बदलत गेली, हे ९० च्या दशकात जन्मलेले मुले खूप चांगल्याने सांगू शकतात. ९० च्या दशकाचा एक वेगळा भाव होता. या दशकाची एक वेगळी ओळख होती. ते दिवस कधीही परत येत नाही म्हणूनच 90s ची मुले आजही त्या दिवसाची आठवण काढतात. सोशल मीडियावर ९० च्या दशकातील जु्न्या अनेक वस्तूंचे फोटो व्हायरल होत असतात, हे फोटो पाहिल्यानंतर पुन्हा त्याच काळात आपण गेलो असं वाटतं. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, त्या व्हिडीओमध्ये ९० च्या दशकातील काही वस्तूंचे फोटो आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला ९० च्या दशकातील काही वस्तुंचे फोटो दिसेल. पहिल्या फोटोमध्ये ब्लँक अँड व्हाइट टिव्ही दिसेल, ज्यावर आपण असंख्य कार्यक्रम पाहिले आहे. त्यानंतर तुम्हाला शाळकरी मुलांची नटराजची कंपास पेटी दिसेल. या कंपास पेटीचे एक वेगळेच आकर्षण असायचे. पुढे तुम्हाला सुलभभारतीचे पुस्तके दिसतील. ही पुस्तके पाहून काही लोकांना शाळेची आठवण येईल. बालपणीचा खेळ म्हणजे भोवरा पुढे दिसेल. त्यानंतर पुढे गोट्या दिसतील. हे दोन्ही खेळ मुलांचे आवडते खेळ होते. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल सायकलचे हँडल दिसेल. त्यानंतर वॉटर गेम दिसेल जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी खेळलाच असेल. त्यानंतर तुम्हाला सर्वांची आवडती पेप्सीचा फोटो दिसेल. ही पेप्सी त्या काळी ५० पैसे किंवा १ रुपयांमध्ये मिळायची. त्यानंतर एक गोड खायची भिंगरी दिसेल. 90s च्या मुलांनी ही भिंगरी एकदा तरी फिरवून खाल्ली असेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
abhishek_shelar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपण ती शेवटची पिढी आहोत ज्यांनी खरं आयुष्य जगले आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त गोड आठवणी” तर एका युजरने लिहिलेय, “ती नटराज ची कंपास भेटल्यावर आम्हाला एक वेगळाच आनंद व्हायचा” आणखी एका युजरने लिहिलेय, “या साऱ्या लहानपणीच्या आठवणी आहेत..सोन्यासारखे दिवस होते ते.. किती खूश आसायचो आपणं तेव्हा ” एक युजर लिहितो, “आत्ताची जनरेशन तर कोणताच खेळ खेळताना दिसत नाही फक्त मोबाईल… काय दिवस होते यार आपले ते खूप मिस करत आहोत” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.