Viral Video : सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. काही लोक व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची कला दाखवतात तर काही लोक हटके जुगाड किंवा माहिती सांगतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण डान्सचे व्हिडीओ, गाण्याचे व्हिडीओ, रेसिपीचे व्हिडीओ, मेकअपचे व्हिडीओ, कॉमेडी व्हिडीओ शेअर करतात. जोडपं, नातवंड आणि आज्जी, पालक आणि चिमुकले, मित्र मैत्रीणी असे एकत्र कधी मजेशीर तर भावुक करणारे व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आई देवाजवळ तिच्या चिमुकल्याला बुद्धी मागण्यास सांगते त्यावर चिमुकला भन्नाट उत्तर देतो. तो नेमका काय म्हणतो, यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसत आहे आणि चिमुकला देवासमोर हात जोडताना दिसत आहे. आईला जेव्हा दिसते की चिमुकला देवाला नमस्कार करतो तेव्हा ती चिमुकल्याला देवाला बुद्धी दे असं म्हणायला सांगते.
आई- देवाला म्हण, मला जरा बुद्धी दे.
चिमुकला – तुला पाहिजे तर तुझं तू माग ना.. चिमुकल्याचे हे उत्तर ऐकून आईला धक्काच बसतो. हा मजेशीर व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
shwetalis_funny_world या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “देवाच्या पाया पडत होता म्हणून वाचला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुलं ही देवाघरची फुलं” तर एका युजरने लिहिलेय, “देवाने अगदी वेळेवर बुद्धी दिली मुलाला..” आणखी एका युजरने लिहिलेय, “आताची पोर लय हुशार आहे” आणखी एका युजरने लिहिलेय,
“ज्याला ज्याची कमी देवाकडे तोच मागतो नेहमी” एक युजर लिहितो, “बापू, बरोबर बोलला, आईसाठी कशाला मागायची बुद्धी” तर एक युजर लिहितो, “यावरून कळतय बुद्धिवान आहे बाळ” अनेक युजर्सनी व्हिडीओतील आईला ऐश्वर्यासारखी दिसत असल्याचे लिहिलेय. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.