Viral Video : लेक ही घरची लक्ष्मी असते. घरात लेक असणे हे समृद्धीचे प्रतिक मानले जाते. ज्या घरात लेक असते तिथे नेहमी चैतन्याचे वातावरण असते. तिच्यामुळे घरात हसते खेळते वातावरण असते. लेक ही सर्वांचीच आवडती आणि प्रिय असते. लहानाची मोठी होऊन जेव्हा ही लेक सासरी जाते, तेव्हा सर्वांचे अश्रु अनावर होतात. तो क्षण प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली सासरी जाण्याचं नाटक करत आहे आणि तिच्या नाटकाला घरचे लोक प्रतिसाद देत भावुक होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना पोट धरून हसायला येईल तर काही लोकांना हसता हसता रडायला येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली दिसेल. तिने साडी नेसली आहे आणि डोक्यावर पदर घेतला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कुटुंबातील सर्व लोक निवांत बसलेले आहेत आणि ही चिमुकली प्रत्येकाजवळ जाऊन मिठी मारत रडण्याचा अभिनय करताना दिसत आहे. तिच्या या अभिनयाला प्रतिसाद देत कुटुंबातील लोक सुद्धा तिच्या या नाटकात सहभागी झालेले दिसत आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहताना आपल्याला हसू आवरणार नाही पण नंतर पुढे काही लोक हा व्हिडीओ पाहताना भावुक होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sangto_aika_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शेवट बघून जा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच डोळ्यात पाणी आले. मला पण एक मुलगी आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “पहिले तर हसायला आलं कारण छोटसं बाळ आहे म्हणून पण शेवट बघुन रडू आवरलं नाही खरच खुप छान व्हिडिओ बनवला आहे, ताई दादा जे कोणी असेल. खरंच मुलींचे आयुष्य खूप कठीण आहे, वाटलं तेवढ सोप नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी मुलगी अवघ्या दीड वर्षाची आहे, या व्हिडिओत मी तिला बघितलं आणि अश्रू अनावर झाले.” एक युजर लिहितो, “हा क्षण म्हणजे.. मुलीच्या आयुष्यातला.. कधीही न विसरणारा क्षण असतो..” तर एक युजर लिहितो, “आतापर्यंतचा सगळ्यात सुदंर व्हिडियो आहे हा” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.