Viral Video : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय आहे. शाळा हा शब्द जरी उच्चारला तरी असंख्य आठवणी डोळ्यासमोर येतात. खरं तर शाळेत असताना आपल्याला शाळेचे महत्त्व कळत नाही पण जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडतो तेव्हा मात्र शाळेची खूप आठवण येते.
आपल्यापैकी अनेक जण लहानपणी शाळेत न जाण्यासाठी वाट्टेल ते कारण शोधायचे. कारण शाळेत असताना शाळा नकोशी वाटायची. काही लोक तर रडत रडत शाळेत जात असे. काही जण शाळेत जाण्यासाठी आई वडिलांचा मार खात असे. आजही अनेक मुले शाळेत न जाण्यासाठी रडतात पण सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एक चिमुकली चक्क शाळेत जाण्यासाठी रडतेय. तिला शाळा सुटल्यानंतर घरी नाही तर परत शाळेत जायचे आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक शाळा दिसेल. या शाळेचे नाव New Poona English Medium school असे आहे. तुम्हाला या शाळेच्या गेटवर पालकांची प्रचंड गर्दी दिसेल. कारण शाळा सुटली आहे आणि पालक मुलांना परत घरी नेण्यासाठी आले आहेत. या गर्दीत एका चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही चिमुकली ढसा ढसा रडत आहे. तिच्या आईने तिचा हात पकडला आहे पण आईचा हातातील आपला हात सोडवण्याचा ती प्रयत्न करत शाळेच्या गेटकडे जाताना दिसत आहे. चिमुकलीला परत शाळेत जायचे आहे, त्यामुळे ती रडतेय. तिचा हा व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती हसत हसत तिला म्हणते की “स्कुलला उद्या जायचं उद्या”
लहान मुले शाळेत न जाण्यासाठी रडतात पण ही चिमुकली चक्क शाळेत जाण्यासाठी रडतेय.
पाहा व्हायरल व्हिडीओ
litil_ruvi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तिथे स्कूलला जायचे नाही म्हणून बाकीची मुलं रडत होती आणि माझी मुलगी स्कूल सुटले तरी तिला स्कूलला जायचे होते…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मॅडम आई पेक्षा जास्त लाड करणारी भेटली असे वाटायला लागले आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “अरे वा,,, शाळेत जाण्यासाठी रडते छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “घरी जास्त काम आहे बाळाला” अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या चिमुकलीचे कौतुक सुद्धा केले आहेत.