Viral Video: सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक रस्त्यावर भयानक स्टंट करताना दिसतात. काही लोक तर स्टंटच्या नादात आपला जीवही धोक्यात टाकतात.सोशल मीडियावर तुम्ही आज अनेक स्टंटचे व्हिडीओ पाहिले असेल पण हा एक व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल. गाडी ही रस्त्यावर चालवण्यासाठी असते पण काही तरूणाने स्टंट करण्याच्या नादात थेट मर्सिडीज SUV बीचवर आणली आणि मग पुढे जे काही घडले, ते तुम्हाला या व्हायरल व्हिडीओत दिसेल.
बीचवर मर्सिडीज घेऊन गेलेल्या तरुणांची फजिती
हा व्हायरल व्हिडीओ गुजरातच्या सुरत शहरातील डुमास बीचवरील आहे. कायद्याने किनाऱ्यावर वाहने चालवणे बंदी आहे पण तरीसुद्धा काही तरुण नियम मोडत चारचाकी गाडी बीचवर घेऊन आले. त्यांनी काही स्टंट करण्याचे प्रयत्न केले पण पुढे जे काही घडले त्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. त्यांची महागडी गाडी चक्क वाळूत अडकली, त्यामुळे गाडीला हालचालही करू शकत नव्हती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुण धो धो पावसात मर्सिडीज SUV गाडी वाळूतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
Sagar Patoliya या एक्स युजरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहे.काही युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. एक युजर लिहितो, “यांच्याबरोबर असंच व्हायला हवं” तर एका युजरने लिहिलेय, “या मूर्ख लोकांवर कारवाई झाली पाहिजे.” आणखी एका युजरन लिहिलेय, “खूप महाग पडले यांना”
डुमास बीच
डुमास बीच हे सूरतमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. सूरत शहरापासून २१ किमी अंतरावर हे सुंदर डुमास बीच आहे. सूर्यास्त बघण्यासाठी लोक येथे मोठ्या प्रमाणावर येतात. दररोज मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी दिसून येते. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान तुम्ही या बीचला भेट देऊ शकता. वरील व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे बीचवर कोणताही स्टंट करणे चुकीचे आणि धोकादायक आहे.