Viral Video : पुणे हे असं शहर आहे, जे महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराचा इतिहास सांगतात. या शहरातील अनेक गमती जमती, किस्से, पुणेरी पाट्या आणि येथील पुणेकरांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. जसे पुणेरी पाट्या नेहमी चर्चेत असतात तसेच पुण्याची पीएमटी बस सुद्धा नेहमी चर्चेत असते.
दर दिवशी हजारो लोक पीएमटीने ये जा करतात. पीएमटी ही पुणेकरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. सध्या पीएमटीचा असाच एक व्हिडीओ एका युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या युजरने एक भयानक किस्सा सांगितला आहे. व्हिडीओत तो सांगतो की एका पीएमटी बसचे ब्रेक झाले आणि त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरने कशा पद्धतीने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला.
PMT बसचे ब्रेक फेल
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पीएमटी बस दिसेल. ही हळू हळू जाताना दिसत आहे. त्यानंतर ती एका ठिकाणी थांबली. या व्हिडीओमध्ये युजर सांगतो, “मित्रांनो या पीएमटीकडे मी पाहत होतो. ड्रायव्हर जोरजोरात ओरडत होता. पाहिलं तर या गाडीचा ब्रेक फेल झाला. त्याने ओरडून ओरडून लोकांना उतरण्यास सांगितले. लोक पटापट उतरले गाडीतून पण गाडीचा ब्रेकच लागत नव्हता. ही पीएमटी तशीच पुढे चालली होती पण कंडक्टरने पटापट खाली उतरवून रोडच्या बाजूला असलेली दगडं जमा करून त्या पीएमटीच्या चाकाच्या खाली लावली. त्यानंतर पीएमटी थांबली. अपघात होण्यापासून थांबला. खरंच लवकर इशारा दिल्यामुळे ड्रायव्हरचं पण कौतुक आहे आणि कंडक्टरचं पण कौतुक आहे आणि लोकांचा जीव वाचला नाहीतर ही गाडी सरळ जाऊन पुढे थांबलेल्या कारवर धडकणार होती.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
pune.arifattar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “योग्य वेळी योग्य पाऊल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ड्रायव्हर कंडक्टर च कौतुक करा पण मेंटेनन्स ठेवणाऱ्या मेकॅनिक लोकांचं काय?” तर एका युजरने लिहिलेय, “फार छान” आणखी एका युजरने लिहिलेय, “तिकीट डबल” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.